-
Vastu Shastra Rules While Eating: एका ताटात जेवल्याने, उष्ट खाल्ल्याने प्रेम वाढतं असं आपण आजवर कितीतरी वेळा ऐकले असेल. मात्र वास्तुशास्त्रातून समोर आलेल्या माहितीनुसार असं करणे हे पती पत्नीच्या संबंधांसाठी घातक मानले जाते.
-
धार्मिक ग्रंथांमध्ये भीष्म पितामह यांनीही याबाबत माहिती दिली आहे. महाभारतातही या नियमांचा उल्लेख आहे.
-
भीष्म पितामह यांनी आदर्श जीवनशैलीविषयी भाष्य करताना पती पत्नीने एकत्र कधीच एका ताटात का जेवू नये याविषयी माहिती दिली आहे.
-
जर पती पत्नी यांनी एका ताटात अन्न ग्रहण केले तर त्यावेळी त्यांच्याकडून एकमेकांची तुलना केली जाण्याची शक्यता असते.
-
जर जेवणाच्या वेळी चर्चांमध्ये त्यांचे एकमत झाले नाही तर भांडण होण्याची शक्यता अधिक असते, परिणामी अन्नाचा अपमान होऊ शकतो.
-
भीष्म पितामह म्हणतात की, एका ताटात जेवल्याने अनेकदा अवलंबत्व वाढते व त्यामुळे एकानेच समजून घ्यायचं व दुसऱ्याची मनमानी असे समीकरण होते.
-
नात्यात पडती बाजू घेणाऱ्याचा एखाद्या वेळी उद्रेक झाला तर पुढे वाद होऊ शकतात. यामुळे पती व पत्नीने सहसा एका ताटात जेवूच नये असा सल्ला दिला जातो.
-
प्रत्येक कुटुंबाने दिवसातील एक वेळचे जेवण तरी एकत्र बसून करावे यामुळे एकोपा वाढण्यास मदत होते असेही अनेक धर्मग्रंथांमध्ये नमूद केले आहे.
-
(टीप- वरील लेख हा गृहीतके व प्राप्त माहितीवर आधारित आहे, यातून अंधश्रद्धा पसरवण्याचा हेतू नाही)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”