-
केस काळेशार, लांबसडक आणि सुंदर असावेत, अशी प्रत्येकाची इच्छा असते. आजच्या मॉर्डन युगामध्ये हेअर स्टाइलचा ट्रेंड कोणताही असो, पण प्रत्येकालाच आपले केस घनदाट आणि मऊ हवे असतात.
-
प्रत्येत ऋतूमध्ये केसांची विशेष काळजी घेणं गरजेचं असतं. महत्त्वाचं म्हणजे, हिवाळ्यात केसांची काळजी घेणं फार महत्त्वाचं असतं. हवामान बदलानुसार आपले आरोग्य, त्वचा आणि केसांवरही परिणाम होत असतात. हिवाळ्यात त्वचा कोरडी आणि निर्जीव होते. त्यामुळे केसं तुटू लागतात आणि केसांची चमकही कमी होत जाते.
-
महिलावर्गाला आपल्या केसांची चिंता अधिक असते. यासाठी अनेकजणी हेअर स्पा, हेअर मसाज आणि कित्येक ब्युटी पार्लर ट्रीटमेंटची मदत घेतात. पण यामध्ये मोठ्या प्रमाणात रसायनांचा वापर होत असल्याने केसांचे नुकसान होते.
-
केसांचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेऊन तुम्ही नैसर्गिक उपचार करू शकता. बदलत्या परिस्थितीनुसार आता महिलावर्ग केसांसाठी नैसर्गिक तसंच घरगुती उपाय करण्यावर भर देत असल्याचे दिसत आहे.
-
केस निरोगी ठेवण्यासाठी नियमित तेलाने केसांची मालिश करणे आवश्यक आहे. यामुळे रक्ताभिसरण सुधारते. तसेच हे टाळूला हायड्रेट ठेवण्यास मदत करते. तुम्ही नियमितपणे खोबरेल तेलाने केसांची मालिश करू शकता.
-
हिवाळ्यात केस धुतल्यानंतर कंडिशनर नक्की वापरा. त्यामुळे केस मऊ आणि चमकदार बनण्यास मदत होते. त्यामुळे केस फारसे गळत नाहीत. शॅम्पू केल्यानंतर, कंडिशनर केसांमध्ये २ ते ३ मिनिटे लावून ठेवा. यानंतर साध्या पाण्याने धुवा.
-
निरोगी केसांसाठी हेअर मास्क वापरा. तुम्ही होममेड हेअर मास्कदेखील वापरू शकता. केळं आणि अंड एकत्र करून तुम्ही हेअर मास्क बनवू शकता. यामुळे केस मऊ आणि चमकदार होण्यास मदत होते.
-
हिवाळ्यात केस धुण्यासाठी खूप गरम पाणी वापरू नका. त्यामुळे केसांमधील नैसर्गिक तेल कमी होते. यामुळे केस कोरडे आणि निर्जीव होतात. तसेच, याने केस गळण्याची समस्या वाढू लागते.
-
येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. (सर्व फोटो: Freepik)
मुंबईतल्या अंधेरी स्टेशनवर कपल झालं बेभान; रोमान्स करताना अक्षरश: हद्दच पार केली, लाजीरवाणा VIDEO होतोय व्हायरल