-
How To Remove Lizard From Home: देशात पालीला अशुभ मानतात. यामुळेच शुभ कार्याच्या दिवसांमध्ये पाल दिसणं किंवा अंगावर पडणं अशुभ मानलं जातं.
-
पालीची किळस वाटल्याने अनेकजण तिला शक्य त्या पद्धतीने घरातून हाकलण्याचा प्रयत्न करतात. जर आपल्या घरात लहान मूल किंवा दम्याचे रुग्ण वृद्ध व्यक्ती असतील तर केमिकलयुक्त औषध घरात फवारणे हा पर्याय नुकसानकारक ठरू शकतो.
-
सर्वात पहिला उपाय म्हणजे कॉफी पावडर आणि तंबाखू या दोघांनाही उग्र दर्प येतो. त्यामुळे कॉफी पावडर आणि तंबाखु एकत्र करुन त्याचे लहान लहान गोळे करुन घरातील कोपऱ्यांमध्ये ठेवा. या दर्पानेचे पाली घरात फिरकत नाहीत.
-
पाली मोरपंखाला घाबरतात. प्राणी तज्ज्ञांच्या माहितीनुसार अनेकदा पाली मोरपंखाला साप समजतात आणि हा साप आपल्याला खाईल या भीतीने त्या घरात येत नाहीत. त्यामुळे घरामध्ये मोरपंख ठेवावा.
-
कांद्यामध्ये सल्फरचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे कांद्याचे पातळ काप करुन ते लाईटजवळ ठेवावेत. यामुळे पाली घरात येणे कमी होईल.
-
पाणी आणि मिरपूड मिसळून मिश्रण तयार करा. हे मिश्रण किचन, बाथरूम, सिंक, व घरातील कोपर्यामध्ये शिंपडा. या उग्र वासामुळे पाली घरातून पळून जातील
-
अंड्याची साल घरात ठेवूनही आपण पालीला पळवून लावू शकता.
-
तुम्ही जेव्हा लसूण सोलता तेव्हा त्याच्या साली फेकण्याऐवजी एका डब्ब्यात जमा करा. यात कडुलिंब, मिरचीचे देठ व गरम पाणी टाकून उकळा. या पाण्याचा स्प्रे घरात जिथे पाली येतात तिथे शिंपडा.
-
डांबर गोळ्या या उत्तम किटकनाशक असतात. कपाटात आणि बेसिनमध्ये किंवा ज्या ठिकाणहून पाली घरात येतात त्या ठिकाणी डांबर गोळ्या ठेवाव्यात.

India beats Pakistan Video: पाकिस्तानी युवतीचा त्रागा; म्हणाली, “हरलात ते ठीक आहे, पण त्या कोहलीचं शतक…”!