-
नव्या वर्षाची सुरुवात होण्यास आता काही दिवसच शिल्लक आहेत. प्रत्येकजण नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी उत्सुक आहे. त्याचप्रमाणे येणारे वर्ष आपल्यासाठी शुभ असणार आहे की अशुभ याबाबतही अनेकांच्या मनात शंका आहेत. (Pexels)
-
ज्योतिषशास्त्रानुसार, येणारे २०२३ हे वर्ष काही राशींच्या लोकांसाठी अतिशय शुभ सिद्ध होणार आहे. नवे वर्ष ग्रह आणि त्यांच्या संक्रमणाच्या आधारावर सुरु होणार आहे. (Pexels)
-
ग्रहांच्या संक्रमणाचा आपल्या जीवनावर विशिष्ट प्रकारे परिणाम होतो आणि या संक्रमणांमुळे सर्व राशींची वार्षिक कुंडलीदेखील प्रभावित होत असते. आज आपण जाणून घेऊया या नवीन वर्षात कोणत्या राशीच्या लोकांना यश मिळण्याची शक्यता आहे.
-
मेष राशीच्या लोकांसाठी नवीन वर्षाच्या सुरुवातीचा काही काळ हा अनिश्चितता आणि संभ्रमाने भरलेला असू शकतो. मात्र यानंतरचा काळ या राशीच्या लोकांसाठी यश देणारा सिद्ध होऊ शकतो. नोकरी किंवा व्यवसायाशी संबंधित कामे निर्धारित वेळेत पूर्ण होऊ शकतात. तसेच कामाच्या ठिकाणी प्रतिष्ठा वाढण्याची संभावना आहे.
-
या वर्षात मेष राशीच्या लोकांच्या आत्त्मविश्वासात वाढ होऊ शकते. या लोकांच्या कामाचे कौतुक होऊन मानसन्मानही वाढू शकतो. मालमत्तेसह अनेक गोष्टींमध्ये आर्थिक लाभ होण्याची संभावना आहे. तसेच पदोन्नती होऊन पगारवाढीची शक्यता आहे. (Pexels)
-
मिथुन राशीच्या लोकांसाठी नवीन वर्ष शुभ ठरू शकते. या वर्षात कामात येणाऱ्या सर्व अडचणी दूर होण्याची शक्यता आहे. या काळात या लोकांना भाग्याची साथ मिळेल.
-
नववर्षात मिथुन राशीच्या लोकांच्या आर्थिक स्थितीत सुधार होण्याची संभावना असून हे लोक कामाचा आनंदही घेतील. मालमत्तेची खरेदी करण्यास हे वर्ष शुभ ठरू शकते.
-
कर्क राशीच्या लोकांसाठी हे वर्ष शुभ असण्याची शक्यता आहे. या दिवसांमध्ये आर्थिक लाभ आणि पदोन्नती मिळण्याची चिन्हे आहेत. वर्ष २०२३ च्या शेवटच्या पहिल्या तिमाहीत, हे लोक त्यांच्या कारकीर्दीत उंची गाठण्याचा आणि आर्थिकदृष्ट्या समृद्ध होण्याचा आनंद घेऊ शकतात.
-
मात्र, या वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत या लोकांना त्यांच्या आयुष्यात चढ-उतारांचा सामना करावा लागू शकतो. या राशीच्या विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष खूप चांगले सिद्ध होऊ शकते.
-
सिंह राशीच्या लोकांना या नवीन वर्षात अनेक संधी मिळू शकतात. सिंह राशीच्या लोकांसाठी जून महिना आर्थिकदृष्ट्या शुभ राहण्याचे संकेत आहेत. २०२३ मध्ये या लोकांना त्यांच्या शत्रूंवर विजय मिळू शकतो.
-
परंतु या राशीच्या लोकांनी सावधगिरी बाळगली पाहिजे. त्यांनी आपल्या वरिष्ठांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची खबरदारी घ्यावी. तसेच ऑक्टोबरनंतर गुंतवणूक टाळावी.
-
येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.

Indus Waters Treaty suspension: “पाकिस्तानला हे परवडणारं नाही”; पाकिस्तानातील तज्ज्ञ सांगताहेत, असे का?