-
२०२३ हे नवीन वर्ष सुरु होण्यासाठी आता केवळ दोन आठवडे शिल्लक आहेत. अशातच प्रत्येकजण नवीन वर्षाकडे आशेने पाहत असतो. प्रत्येकालाच नवीन वर्ष अतिशय उत्साहात सुरु करायचे असते. १ जानेवारी २०२३ रोजी शिव, अमृत आणि सर्वार्थ सिद्धी योग होणार आहे. (Pexels)
-
तसेच वर्षाची सुरुवात अश्वनी नक्षत्राने होत आहे. केतू हा ग्रह अश्वनी नक्षत्राची देवता मानला जातो. ज्योतिषशास्त्रात शिव, अमृत आणि सर्वार्थ सिद्धी योग अत्यंत शुभ मानले जातात. या शुभ योगांमुळे तीन राशींच्या लोकांची या वर्षी करिअर आणि व्यवसायात चांगली प्रगती होऊ शकते.
-
सर्वार्थ सिद्धी आणि अमृत योगाच्या संयोगामुळे मकर राशीच्या लोकांचे नशीब चमकू शकते. या वर्षात त्यांना आकस्मिक धनलाभ होण्याची संभावना आहे. या लोकांचे अडकलेले पैसे यावेळी मिळू शकतात. त्याचबरोबर हे लोक नवीन वर्षात मालमत्ता किंवा वाहन खरेदी करू शकतात.
-
या लोकांची रखडलेली योजना यावेळी मार्गी लागू शकते आणि त्यामध्ये त्यांना यशही मिळू शकते. व्यावर करणाऱ्या लोकांना नवीन वर्षात चांगला फायदा मिळू शकतो. तसेच व्यवसायाचा विस्तारही होऊ शकतो.
-
वृषभ राशीच्या लोकांना सर्वार्थ सिद्धी योग आणि अमृत योग विशेष लाभदायक सिद्ध होऊ शकतो. या लोकांना नोकरीच्या नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात. तर नोकरदारांना या काळात प्रमोशन मिळू शकते.
-
विशेष म्हणजे येणाऱ्या नवीन वर्षात वृषभ राशीच्या लोकांचे आपल्या वडिलांबरोबरचे संबंध सुधारू शकतात. तसेच वडिलांच्या सहकार्यामुळे त्यांना धनलाभ होण्याचीही संभावना आहे.
-
सर्वार्थ सिद्धी आणि अमृत योगामुळे मेष राशीच्या लोकांची करिअर आणि व्यवसायात प्रगती होऊ शकते. त्याचबरोबर या वर्षी त्यांना नशिबाची साथ मिळू शकते. महत्त्वाची कामे मार्गी लागू शकतात.
-
परदेशी नोकरी करण्यासाठी उत्सुक असणाऱ्यांसाठी नवीन वर्षी चांगल्या संधी निर्माण होऊ शकतात. तसेच, व्यवसायाशी निगडित लोक कामाच्या निमित्ताने अनेक प्रवास करू शकतात. यामध्ये त्यांना यश मिळू शकते.
-
येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.
‘पहलगाम हल्ल्यामागे भाजपा सरकारचा हात’, आमदार अमिनूल इस्लाम यांचे वादग्रस्त विधान; आसाम पोलिसांनी केली अटक