-
डोळा हा माणसाच्या शरीरातील महत्त्वाचा अवयव आहे. डोळे फडफडणे हे खूप सामान्य लक्षण आहे.
-
डोळा हा काही सेकंदासाठी किंवा १ ते २ मिनिटांपर्यंत फडफडत असतो. डोळा फडफडणे यामागे शुभ, अशुभ अशी कारणे जोडली जातात.
-
स्त्री आणि पुरुष यांचा उजवा आणि डावा डोळा फडफडणे यामागेही वेगवेगळे अर्थ असतात. सामुद्रिक शास्त्रांमध्ये याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.
-
डोळा फडफडतोय असं कोणी म्हटलं तरी आपल्याला ते शुभ की अशुभ असा प्रश्न पडतो.
-
वास्तुशास्त्रानुसार किंवा ज्योतिषशास्त्रानुसार डोळ्याची फडफड होणे हे शुभ आणि अशुभ अशा दोन्हीही घटनेचे पूर्वसंकेत देतात.
-
भविष्यात होणाऱ्या एखाद्या घटनेची पूर्वसूचना आपल्याला याद्वारे मिळते, असेही म्हटले जाते.
-
शास्त्रानुसार असे म्हटलं जातं की, जर एखाद्या पुरुषाचा उजवा डोळा फडफडत असेल किंवा त्या डोळ्याची पापणी लवत असेल तर ते अत्यंत शुभ मानले जाते.
-
अशा पुरुषांना भविष्यात मोठा आर्थिक फायदा होतो. त्यांची अडकलेले अनेक कामे मार्गी लागतात.
-
विशेष म्हणजे त्यांना कामाच्या ठिकाणी प्रमोशन मिळू शकते. तसेच त्यांच्यावर लक्ष्मी प्रसन्न होऊन त्यांना आर्थिक नफा होतो.
-
तसेच जर पुरुषांचा डावा डोळा फडफडत असेल तर त्याला भविष्यात मोठ्या संकटाचा सामना करावा लागतो.
-
त्यांच्या सुखाला ग्रहण लागण्याची शक्यता आहे. त्याबरोबरच त्या पुरुषाचे शत्रुत्व वाढण्याची शक्यता असते.
-
पण स्त्रियांच्याबाबत ही गोष्ट नेमकी उलट असते. जर महिलांचा उजवा डोळा किंवा पापणी फडफडत असेल तर ते अत्यंत अशुभ मानले जाते.
-
याद्वारे तुम्हाला भविष्यात येणाऱ्या एखाद्या अशुभ घटनेची किंवा संकटाची चाहूल मिळते.
-
तसेच त्या महिलेच्या बाबतील काही तरी अप्रिय घटना घडेल असे संकेतही याद्वारे मिळतात.
-
मात्र जर एखाद्या महिलेचा डावा डोळा किंवा डाव्या डोळ्याची पापणी फडफडत असेल तर तिला लवकरच मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता असते.
-
त्यांची अडकलेली अनेक कामे मार्गी लागतात. विशेष म्हणजे त्यांना कामाच्या ठिकाणी प्रमोशन मिळू शकते, असे बोललं जाते.
‘एमपीएससी’च्या इतिहासात पहिल्यांदाच २७९५ जागांसाठी जाहिरात, ‘या’ पदवीधरांना अर्जाची संधी…