-
अंकशास्त्रानुसार, ज्यांचा जन्म ६, १५ आणि २४ तारखेला झाला, त्यांचा मूलांक ६ असतो. या अंकाचे प्रतिनिधित्व शुक्र ग्रह करतो. तसेच, या लोकांना विलासी जीवन जगणे आवडते. (Freepik)
-
हे लोक दिसायला सुंदर आणि आकर्षक मानले जातात. यामुळेच समोरच्या व्यक्ती त्यांच्याकडे नेहमीच आकर्षित होतात, असे म्हणतात. तसेच, हे लोक कला आणि संगीत प्रेमी असतात आणि त्यांचे जीवन भौतिक जगासह आध्यात्मिक जगात व्यतीत होते.
-
ज्योतिषशास्त्रानुसार, वर्ष २०२३ केतू ग्रहाचे प्रतिनिधित्व करत आहे. त्याचबरोबर मूलांक ६ आणि ७ मध्ये पारस्पर मित्रतेची भावना असल्याने या मूलांकांची युती माध्यम आणि कला क्षेत्रातील लोकांसाठी भाग्यवान सिद्ध हौण्यची संभावना आहे.
-
या वर्षी या मूलांकांच्या लोकांना प्रेमविवाहात यश मिळू शकते. तसेच, अचानक आर्थिक लाभही मिळू शकतो. आज आपण २०२३ मध्ये मूलांक ६ असलेल्या लोकांचे करिअर, व्यवसाय आणि वैवाहिक जीवन कसे असेल ते जाणून घेऊया…
-
अंकशास्त्रानुसार, २०२३ हे वर्ष चित्रपट निर्माते आणि कलाकारांसाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकते. तसेच २०२३ मध्ये या मूलांकाच्या लोकांनी स्वतःच्या कामात अधिक लक्ष घातले तर ते अधिक फलदायी सिद्ध होईल, अन्यथा इतर लोक फायदा घेऊ शकतात.
-
दुसरीकडे, या लोकांना नोकरीत हव्या त्या ठिकाणी बदली मिळू शकते येते. यासोबतच नोकरीत बढती आणि पगारात वाढ होण्याची दाट शक्यता आहे.
-
जर तुम्ही राजकारणाशी संबंधित असाल तर तुम्हाला यश मिळू शकते. एखादे पद मिळू शकते. त्याच वेळी, व्यावसायिक त्यांच्या व्यवसायात नवीन संसाधने जोडू शकतात. (File Photo)
-
जे लोक बेरोजगार आहेत त्यांच्यासाठी हे वर्ष फलदायी ठरू शकते. येणाऱ्या वर्षात नोकरी मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. तसेच जे विद्यार्थी तांत्रिक क्षेत्राशी निगडीत आहेत, त्यांना यश मिळू शकते.
-
व्यापार्यांना नवीन माध्यमांमुळे आर्थिक लाभ होण्याचे संकेत आहेत. तसेच, या वर्षी तुम्ही भौतिक सुखांवर पैसे खर्च करू शकता. त्याचबरोबर, सिव्हिल इंजिनिअरिंग, रिअल इस्टेट किंवा फिल्म लाइनशी संबंधित लोकांना पैसे कमविण्याची संधी मिळू शकते. (File Photo)
-
२०२३ मध्ये तुम्ही घरगुती वस्तूंवर पैसे खर्च करू शकता. यामुळे कुटुंबीय आनंदी राहू शकतात. तसेच, येणाऱ्या वर्षात काही कौटुंबिक समस्यांपासूनही मुक्तता मिळू शकते.
-
या वर्षी तुम्हाला प्रेमसंबंधांमध्ये यश मिळू शकते. म्हणजे तुमच्या प्रेमाचे रूपांतर लग्नात होऊ शकते. दुसरीकडे, ज्यांचे लग्न झाले आहे, त्यांचे वैवाहिक जीवन या वर्षी सुधारेल असेल. येणाऱ्या वर्षात जोडीदाराची साथ मिळू शकते.
-
या वर्षी तुम्हाला आरोग्याच्या समस्या जाणवू शकतात. कारण शुक्र आणि केतूच्या संयोगामुळे तुमची प्रतिकारशक्ती कमकुवत होऊ शकते. यामुळे तुम्हाला काही आजारांचा सामना करावा लागू शकतो.
-
दुसरीकडे, २०२३ च्या मध्यात तुम्हाला आणखी समस्यांना सामोरे जावे लागू शकते. अपघाताचे योग तयार होत असल्याने वाहन चालवताना काळजी घ्यावी.
-
येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.
-
हेही पाहा: Photos: २०२३ मध्ये उघडू शकते ‘या’ राशींच्या नशिबाचे दार; मुख्य ग्रहांच्या संक्रमणामुळे आर्थिक लाभाची प्रबळ संधी (सर्व फोटो: Pexels)

पत्नी, मुलासमोर दहशतवाद्यांनी डोंबिवलीतील पर्यटकाच्या डोक्यात गोळ्या झाडल्या, मुलावर वडिलांचा मृतदेह पाहण्याची वेळ