-
नवं वर्ष सुरु होण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी उरला आहे. नवीन वर्षाचे आखाडे बांधत असताना ग्रहांची साथ मिळणार का? याकडेही लक्ष लागून आहे. (फोटो- Pixabay)
-
ज्योतिषशास्त्रानुसार,२०२३ या येत्या वर्षात ग्रहांची स्थिती पाहता काही राशींसाठी येतं वर्ष चांगलं ठरणार आहे. नोकरी आणि व्यवसायात आर्थिकदृष्ट्या फायदा होण्याची शक्यता आहे.
-
ज्योतिषशास्त्रानुसार, वर्ष २०२३ सहा राशीच्या लोकांसाठी हे खूप चांगले ठरू शकते. सहा राशीच्या लोकांना नोकरीमध्ये लाभ मिळू शकतो आणि पदोन्नती व्यतिरिक्त पगारातही वाढ होऊ शकते. जाणून घ्या त्या कोणत्या राशी आहेत?
-
मेष: २०२३ हे वर्ष करिअरच्या दृष्टीने मेष राशीच्या लोकांसाठी खूप चांगले असणार आहे आणि नोकरीशी संबंधित सर्व समस्या हळूहळू दूर होतील. याशिवाय पदोन्नती आणि पगारातही वाढ होण्याची शक्यता आहे.
-
सिंह: सिंह राशीच्या लोकांसाठी नवे वर्ष हे करिअरसाठी खूप चांगलं वर्ष असणार आहे आणि हे लोक कठोर परिश्रमाच्या जोरावर नवीन उंची गाठतील.नोकरी करणाऱ्या लोकांना बढती मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय हव्या त्या ठिकाणी ट्रान्सफरही मिळू शकते.
-
वृषभ: वर्ष २०२३ मध्ये वृषभ राशीच्या लोकांना करिअरच्या दृष्टीने चांगले परिणाम मिळतील आणि नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना नोकरी मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. याशिवाय नोकरी करणाऱ्यांना बढती आणि नोकरीतील बदलामध्ये यश मिळू शकते. -
तूळ: तूळ राशीच्या लोकांना २०२३ मध्ये अनेक यश मिळू शकते आणि नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना चांगल्या संधी मिळतील. याशिवाय जे आधीच नोकरी करत आहेत त्यांच्यासाठी चांगले बदल होतील.
-
धनू: राशीच्या लोकांना नव्या वर्षांत भाग्याची साथ मिळेल. व्यवसायात प्रगती, धन संपत्तीतही वाढ होऊ शकते. सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करत असाल तर त्यातही यश मिळण्याची शक्यता आहे. तुमची मेहनत कामी येईल आणि तुमचा प्रभावही वाढू शकतो.
-
कुंभ: कुंभ राशीच्या लोकांसाठी नोकरीच्या ठिकाणी पदोन्नतीची शक्यता आहे. उत्पन्नात वाढ आणि संपत्ती जमा होण्याची शक्यता आहे. मे महिन्यात नोकरीत प्रमोशन मिळण्याचीही शक्यता आहे. (फोटो सौजन्य-संग्रहित छायाचित्र)
Crime News : १७ वर्षीय बलात्कार पीडितेवर पोलिसाने पुन्हा केला बलात्कार, खाकी वर्दीला लाज आणणारी घटना कुठे घडली?