-
भरपूर पाणी प्यावे, असे आपण नेहमी ऐकतो. पण भरपूर म्हणजे नेमकं किती पाणी प्यावे, ते कळत नाही. आणि भरपूर पाणी पिण्याच्या नादात आपण जास्तीचे पाणी पिऊन बसतो. जे आरोग्यास चांगले नसते.
-
बरेच लोक एकाच वेळी दोन दोन ग्लास पाणी पितात. यामुळे ही शरीराला त्रास होऊ शकतो. त्यामुळे आपले वय आणि वजन किती आहे, याचा विचार करून मग त्या हिशोबाने पाणी पिले पाहिजे.
-
प्रत्येकाच्या वयानुसार पाण्याची गरज वेगवेगळी असते. १५ वर्षे वय पर्यंतच्या मुलांनी साधारणपणे एक ते दोन लिटर पाणी पिले पाहिजे.
-
प्रौढ व्यक्तींनी तीन ते चार लिटर पाणी दररोज प्यावे. ज्यांचे वय ६० वर्षे पेक्षा जास्त आहे अश्या व्यक्तींनी तीन लिटर पर्यंत पाणी प्यावे.
-
तसेच २५ किलो वजनाच्या व्यक्तीने चार ते पाच ग्लास पाणी पिणे आवश्यक असते. त्याच प्रमाणे ५० किलो वजनाच्या व्यक्तीने दिवसातून आठ ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे.
-
मेहनतीचे काम करणाऱ्यांनी व गरोदर स्रियांनी या पेक्षा थोडे म्हणजे एक दोन ग्लास जास्त पाणी पिल्यास चालते.(Photo-freepik)
-
वजनानुसार पाणी पिण्याचे सूत्र, प्रथम तुमचे वजन मोजा. एकदा शरीराचं वजन (किलोग्रॅममध्ये) तपासलं गेल्यानंतर त्या संख्येला ३० ने भागायचं. येणारी संख्या ही रोज किती लीटर पाणी प्यायला हवं याची गणना आहे.
-
म्हणजेच, या सूत्रानुसार, आपल्याला समजेल की, शरीराच्या वजनानुसार आपण दररोज किती लिटर पाणी प्यावं. समजा वजन ६० किलो असेल तर ते ३० ने भागाकार केल्यास २ ही संख्या मिळेल. म्हणजेच, ६० किलो वजनाच्या व्यक्तीने दररोज २ लिटर पाणी प्यावं.
-
जर वजन ५० किलो असेल तर १.६ लिटर (१ लिटर आणि ६०० मिली) पाणी प्या. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, जर तुम्ही योग्य प्रमाणात पाणी प्यायले तर ते वजन कमी करण्यातही मदत करेल. पाण्यात कॅलरीज नसतात. म्हणजेच जितके जास्त पाणी प्याल तितके वजन कमी होईल आणि शरीर हायड्रेटेड राहील. (फोटो सौजन्य: संग्रहित फोटो)
![how this old lady used to look at young age](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Add-a-heading-76.jpg?w=300&h=200&crop=1)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”