-
ज्योतिषशास्त्रानुसार, शनिनंतर राहूचे मार्गक्रमण सर्वात मंद आहे. हा ग्रह नेहमी प्रतिगामी गतीने फिरतो आणि सुमारे दीड वर्षांच्या कालावधीत त्याचे स्थान बदलतो. शास्त्रानुसार ३० ऑक्टोबर २०२३ पर्यंत हा ग्रह मंगळाची रास म्हणवल्या जाणाऱ्या मेष राशीत राहील.
-
यानंतर राहू मेष राशीतून बाहेर पडून गुरूच्या मीन राशीत प्रवेश करेल. ज्योतिष सांगतात की नवीन वर्षात राहु पाच राशीच्या लोकांना खूप त्रास देऊ शकतो. या राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया.
-
मेष: राहूच्या प्रभावामुळे २०२३मधील काही काळ तुम्हाला गोंधळात टाकणारा असू शकतो. तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये घाई करू शकता. यामुळे तुमच्या कामात अडचणी येण्याचे प्रमाण वाढू शकते. तसेच, या काळात तुम्ही शत्रूच्या कटकरस्थानांचे बळी ठरू शकता. लोकांशी तुमचे वाद होऊ शकतात. कुटुंबियांशीही तुमचे मतभेद होऊ शकतात. म्हणूनच या काळात खबरदारी बाळगावी.
-
वृषभ: राहूच्या प्रभावामुळे नवीन वर्षात तुमच्या खर्चात वाढ होऊ शकते. या दिवसांमध्ये तुमच्या वायफळ खर्चांमध्ये वाढ होऊ शकते. याच कारणामुळे तुमच्या मानसिक त्रासात वाढ होऊ शकते. सोप्या पद्धतीने पैसे कमावण्याची लालसा महागात पडू शकते. तसेच शारीरिक त्रासामध्येही वाढ होण्याची संभावना आहे.
-
तूळ: येणाऱ्या नवीन वर्षात व्यावसायिक बाबींमध्ये तुम्हाला नुकसान होऊ शकते. विचार न करता निर्णय घेणे आर्थिकदृष्ट्या हानिकारक ठरू शकते. भागीदाराशी असलेल्या संबंधांमध्ये काळजी घेणे गरजेचे आहे. लोकांबरोबर मतभेद होऊ शकतात. तसेच, नोकरदारांना या काळात सावध राहणे आवश्यक आहे. कार्यस्थळी सहकाऱ्यांबरोबर वाद होऊ शकतात.
-
मकर: राहूच्या प्रभावामुळे मकर राशीच्या लोकांच्या आयुष्यात चढ-उतार येऊ शकतात. कौटुंबिक जीवनात सुसंवाद निर्माण करण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागू शकतात. घरातील वातावरण काहीसे अशांत असण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात गुंतागुंत वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे प्रत्येक गोष्ट शांततेने करावी. संयम दाखवावा लागू शकतो आणि गोष्टी सहज समजून घेण्याचा प्रयत्न करावा लागेल.
-
मीन: राहूच्या शुभ प्रभावामुळे मीन राशीच्या लोकांना आर्थिकदृष्ट्या फायदा होऊ शकतो. पण यामुळे त्यांचे कुटुंबियांबरोबरचे नातेसंबंध बिघडू शकतात. त्यांचे कुटुंबाबरोबरचे अंतर वाढू शकते. म्हणूनच कोणतीही गोष्ट करताना नीट विचार करावा. तसेच अयोग्य आहारामुळे आरोग्य बिघडू शकते.
-
हेही वाचा : Photos: २०२३ मध्ये उघडू शकते ‘या’ राशींच्या नशिबाचे दार; मुख्य ग्रहांच्या संक्रमणामुळे आर्थिक लाभाची प्रबळ संधी
-
येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.
भरलग्नात नवरा-नवरी बेभान! लग्नसोहळ्यात नातेवाईकांसमोर नवरीने केलं असं काही की…, VIDEO पाहून बसेल धक्का