-
नारळपाणी हे आपल्या शरीरासाठी अतिशय उपयुक्त आहे. कोणत्याही रुग्णाला भेटायला जाताना आपण त्यांच्यासाठी फळे आणि नारळपाणी आवर्जून घेऊन जातो.
-
नारळपाण्याचे सेवन केल्याने आपले शरीर हायड्रेटेड राहते. तसेच, यामुळे आपले पचन सुधारते आणि पोट फुगण्याच्या समस्येपासून आराम मिळतो.
-
पोषक तत्त्वांनी भरपूर असलेल्या नारळाच्या पाण्याचे सेवन केल्याने आपली रोगप्रतिकारक शक्तीही मजबूत होते. उच्च रक्तदाबाच्या रुग्णांसाठी याचे सेवन खूप फायदेशीर ठरू शकते. तसेच, वाढत्या वजनाने त्रस्त असणाऱ्यांनी नारळपाणी प्यायल्यास वजन नियंत्रण येऊ शकते.
-
नारळपाणी पिण्याचे अनेक फायदे असले तरी बहुतेकांना असे वाटते की मधुमेहाच्या रुग्णांनी नारळाचे गोड पाणी पिऊ नये. या संबंधीच्या काही प्रश्नाची उत्तरे आज आपण जाणून घेणार आहोत.
-
नारळाचे पाणी जरी चवीला गोड असले तरीही याचे सेवन करणे मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरू शकते. नारळपाणी मधुमेहाच्या रुग्णांना कशाप्रकारे मदत करू शकते हे आज आपण जाणून घेऊया.
-
पोषक तत्वांनी युक्त नारळपाण्याचे सेवन केल्याने रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते. हे शरीरातील पाण्याची कमतरता पूर्ण करून शरीराला थंडावा देते.
-
एक ग्लास नारळ पाण्यात पोटॅशियम, इलेक्ट्रोलाइट, सोडियम, जीवनसत्त्वे, खनिजे, सोडियम, मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते. म्हणूनच याच्या सेवनाने शरीर निरोगी राहते. यामध्ये असलेले मॅग्नेशियम रक्ताभिसरण सुधारते.
-
अँटी-ऑक्सिडंट गुणधर्मांनी युक्त नारळाचे पानी प्यायल्याने किडनी निरोगी राहते आणि दृष्टी सुधारते.
-
मधुमेह वाढल्यास नजर धूसर होत जाते. अशा स्थितीत नारळ पाण्याच्या सेवनाने मधुमेहाच्या रुग्णांना फायदा होतो.
-
तज्ज्ञांच्या मते, दररोज नारळ पाण्याचे सेवन केल्यास रक्तातील साखर कमी होण्यास मदत होते. त्यात असलेले मॅग्नेशियम इंसुलिनची संवेदनशीलता वाढवते.
-
मात्र, काही लोकांना नारळाच्या पाण्याचे सेयाव करणे त्रासदायक ठरू शकते. अशा लोकांनी नारळाच्या पाण्याचे सेवन करू नये.
-
सर्दी, कफ असलेल्या लोकांनी नारळाच्या पाण्याचे सेवन करू नये.
-
किडनीच्या रुग्णांनी नारळ पाण्याचे सेवन काळजीपूर्वक करावे.
-
रक्तदाब कमी करण्यासाठी नारळपाणी खूप प्रभावी आहे, त्यामुळे कमी रक्तदाब असलेल्यांनी ते टाळावे.
-
येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता कृपया तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. (Photos: Freepik)

09 April Horoscope: अचानक लाभ अन् मौल्यवान वस्तूंची खरेदी, कोणत्या राशीच्या नशिबात कसे येईल सुख? वाचा बुधवारचे राशिभविष्य