-
पती-पत्नीचे नाते म्हटले की त्यामध्ये प्रेमाबरोबरच लहान-मोठी भांडणेही येतातच. मात्र, अनेक संशोधनातून असे निदर्शनास आले आहे की हिवाळ्यात पुरुषांमध्ये चिडचिड आणि राग येण्याचे प्रमाण सरासरीपेक्षा अधिक असते. परंतु, यामागचे नेमके कारण तुम्हाला माहीत आहे का?
-
आज आपण हिवाळ्यात पुरुषांना जास्त राग का येतो याचे वैज्ञानिक कारण जाणून घेणार आहोत.
-
हिवाळ्याला सुरुवात झाली की, बहुसंख्य पुरुषांच्या वर्तनात बदल दिसून येतो. ते तणावात असतात. तसेच छोट्या-छोट्या गोष्टींवरून चिडचिडही करतात. थंडीचा कडाका वाढत गेल्यानंतर त्यांच्या रागाचा पारा वाढतो.
-
पुरुषांच्या या स्वभाव बदलाची नोंद वैद्यकीय तज्ज्ञांनीही घेतली असून त्यांच्या म्हणण्यानुसार थंडीच्या आगमनानंतर ‘सीजनल इफेक्टिव्ह डिसऑर्डर’चा (सीएडी) परिणाम पुरुषांमध्ये दिसू लागतो.
-
‘सीएडी’चा संबंध हा ‘डे लाइट’ अर्थात दिवसाच्या प्रकाशाबरोबर आहे. हिवाळ्यात आपल्याला अधिक राग येतो. यालाच ‘विंटर डिप्रेशन’ असेही म्हणतात. ही एक मानसशास्त्रीय स्थिती आहे.
-
हिवाळ्यात रात्र मोठी आणि दिवस लहान असतो. त्यामुळे सूर्यप्रकाश कमी प्रमाणात मिळतो. त्याचा थेट परिणाम मानसिकदृष्टय़ा पुरुषांवर पडतो.
-
क्रोध वाढवणारे रसायन : मेंदूत सेरोटोनिन हे रसायन असते. ते न्यूरोट्रान्समीटर म्हणून काम करते.
-
सेरोटोनिन हे केवळ माणसाचे वर्तन नियंत्रणाचेच काम न करता ते पचनही सुरळीत ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते.
-
शरीरातील सेरोटोनिनचे प्रमाण हे सुर्यप्रकाशातून मिळणाऱ्या डी जीवनसत्त्वाच्या प्रमाणानुसार ठरते.
-
सेरोटोनिनची मात्रा कमी झाल्यास चिडचिड आणि तणाव वाढतो. त्यामुळेच सूर्यप्रकाश आणि मानसिक आरोग्य यांचा संबंध लक्षात घेणे क्रमप्राप्त ठरते, असे तज्ज्ञ सांगतात.
-
एक संशोधनानुसार, १४% लोकांना हिवाळ्यात कोणत्या न कोणत्या कारणामुळे ताण-तणाव जाणवतो, तर ३५% लोकांना मोठ्या प्रमाणावर राग येतो.
-
बहुतेक लोक हिवाळ्यात काम करण्याच्या मूडमध्ये नसतात. मात्र, काम करणे प्रत्येकाला भाग असते. अशा परिस्थितीत कामात अडचणी पुरुषांच्या मनस्थितीवर परिणाम होतो आणि त्यांना राग येऊ शकतो.
-
हिवाळ्यात शरीराला अधिक विश्रांतीची गरज असते. अशा परिस्थितीत लवकर थकवा आल्याने चिडचिड वाढते. तसेच, चिंताही होऊ शकते. त्यामुळे पुरुषांचा स्वभाव आक्रमक होतो. या दरम्यान नकारात्मक भावनाही वाढू लागतात.
-
हिवाळ्यात दिवस लहान असतात. अशा परिस्थितीत पुरुष कार्यालयीन काम पूर्ण करता येत नाही, त्यामुळे त्यांना मानसिक ताण येऊ लागतो. तसेच, हिवाळ्यात त्यांना स्वतःकडे लक्ष देता येत नाही, त्यामुळे त्यांचा स्वभाव थोडा आक्रमक होतो.
-
येथे देण्यात आलेली माहिती गृहितके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक महितीकरिता तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. (Photos: Pexels)
Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”