-
आग्रह करण्याची भारतीयांना भारी सवय असते. विशेषतः जरी घरी कोणी जेवायला आलं की, घ्या घ्या करून गरजेपेक्षा जास्त पानात वाढलं जातं.
-
तुमचा भाव जरी यात चांगला असला तरी काही चुका फारच महागात पडू शकतात. शास्त्रात आपण ताटामध्ये ३ पोळ्या एकत्र का वाढू नयेत याविषयी माहिती देण्यात आली आहे
-
अंकशास्त्रानुसार सुद्धा ३ हा अंक अशुभ मानला जातो. ही विषम संख्या असल्याने असा समज रूढ झाला असावा. तुम्ही जेवण वाढताना सुद्धा शक्यता २ किंवा २ ने भागाकार होईल अशा संख्येतच पोळ्या वाढण्याचा सल्ला दिला जातो.
-
हिंदू शास्त्रात जेव्हा एखाद्या माणसाचे निधन होते तेव्हा त्याच्या नावे तेराव्याचे विधी केले जातात. यावेळी त्रयोदशीला तीन पोळ्या वाढण्याची पद्धत आहे असे म्हणतात. त्यामुळे तीन पोळ्या हे मृत व्यक्तीचे भोजन असल्याचे मान्यता आहे
-
तीन पोळ्यांच्या संदर्भात आणखी एक समज म्हणजे तीन पोळ्या वाढल्यास त्या जेवणाऱ्या व जेवू घालणाऱ्यामध्ये वाद होऊ शकतो असे समजले जाते. तीन हा शत्रुत्वाचा अंक म्हणूनही ओळखला जातो
-
आहारतज्ञांच्या माहितीनुसार तीन पोळ्या वाढल्यास पोटाची भूकही लगेच मिटू शकते, यानंतर तुम्ही भात खायची इच्छा कदाचितच होऊ शकते. शरीराला पुरेपूर पोषण मिळावे यासाठी दोन पोळ्या व वाटीभर भात उत्तम ठरतो.
-
केवळ पोळ्याच नव्हे तर भाताच्या बाबत सुद्धा हाच नियम मानला जातो. भात वाढताना आपण एकच चमचा भात कधीही वाढू नये असे म्हणतात.
-
किंचित का होईना पण निदान दोन किंवा दोनने भागाकार होणाऱ्या संख्येत भात ताटात वाढला जावा असे अनेक वयस्करांकडून सांगितले जाते.
-
जेवणाचे ताट वाढण्यासाठी आहारतज्ज्ञांनी व शास्त्रातही अनेक नियम आहेत, यातील सर्वात सोपा नियम म्हणजे जे पदार्थ अधिक खाल्ले जातात ते उजवीकडे व तोंडी लावण्याचे पदार्थ डावीकडे वाढले जावे.
Chhaava Deleted Scene : ‘छावा’ चित्रपटातील डिलीट केलेला सीन व्हायरल, जबरदस्त संवाद ऐकून अंगावर येईल काटा