-
नवीन वर्ष सुरु व्हायला आता फक्त काही दिवसच शिल्लक आहेत. अनेक ठिकाणी नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी सुरु झाली आहे. (Photo-pexels)
-
हे नवीन वर्ष २०२३ अनेकांना लाभदायक ठरणार असल्याची शक्यता आहे. तसेच काही राशीच्या लोकांचे नशीबच उजळणार असल्याचे ज्योतिष शास्त्रात सांगण्यात आले आहे. (Photo-pexels)
-
ज्योतिष शास्त्रानुसार, २०२३ हे वर्ष काही राशींच्या करिअर आणि नौकरीच्या दृष्टीने चांगले जाणार असल्याची शक्यता आहे.
-
त्यांच्या करिअरमध्ये खूप चांगले परिणाम मिळण्याची शक्यता असून नोकरीत पगारवाढही होण्याची शक्यता आहे. चला तर जाणून घेऊया कोणत्या आहेत या चमकणाऱ्या राशी.
-
मिथुन राशीच्या कुंडलीत शनि शुभ असल्यानं तुम्हाला चांगले परिणाम मिळण्याची शक्यता आहे. मिथुन राशीच्या लोकांसाठी नवीन वर्ष आनंद घेऊन येणारे असू शकते.
-
कार्यक्षेत्रात या राशीच्या लोकांना सन्मान मिळण्याची शक्यता आहे. या वर्षी मिथुन राशीच्या लोकांच्या करिअरमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे.
-
कर्क राशीच्या लोकांसाठी २०२३ हे वर्ष खूप चांगले जाऊ शकते. ज्योतिष शास्त्रानुसार कर्क राशीच्या लोकांच्या कुंडलीत गुरु ग्रह शुभ लाभ देऊ शकतो. करिअर मध्ये नवीन संधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
-
येत्या वर्षात कर्क राशीच्या लोकांच्या उत्पन्नातही वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच या नवीन वर्षात कर्क राशीच्या लोकांना करिअरमध्ये मोठी संधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
-
सिंह राशीच्या लोकांसाठी नवीन वर्ष खूप शुभ असू शकते. शनिदेव तुमच्या सातव्या भावात येणार आहेत. तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये मोठे यश मिळण्याची शक्यता आहे.
-
नौकरी करणाऱ्या लोकांना प्रमोशन मिळण्याची शक्यता असून तुमच्या पगारातही वाढ होण्याची शक्यता आहे.
-
कुंभ राशीच्या लोकांसाठी २०२३ हे वर्ष खूप शुभ असू शकते. वार्षिक कुंडलीनुसार बुध आणि सूर्याचे संक्रमण तुमच्या अकराव्या घरात होत आहे. कुंडलीतील अकरावे घर हे उत्पन्नाचे स्थान मानले जाते.
-
तुमच्या करिअरमध्ये प्रगती होण्याची शक्यता असून तुम्हाला नौकरीच्या नवीन संधी उपलब्ध होण्याचीही शक्यता आहे. (फोटो- सौजन्य संग्रहित छायाचित्र)
त्र्यंबकेश्वर मंदिरातील प्राजक्ता माळीच्या ‘या’ कार्यक्रमाला माजी विश्वस्तांकडून विरोध; म्हणाल्या, “चुकीचा पायंडा…”