-
मधुमेह हा असा आजार आहे ज्यावर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. मधुमेह नियंत्रणात न राहिल्यास या आजाराचा धोका वाढण्याचा धोका जास्त असतो.
-
मधुमेह हा आजार खराब आहार, बिघडलेली जीवनशैली तसेच हार्मोनल असंतुलन, हृदयविकार, धूम्रपान, शारीरिक हालचालींचा अभाव आणि लठ्ठपणामुळे होतो.
-
या आजारात रक्तातील साखरेची पातळी सतत कमी-जास्त होत राहते. यामुळे हृदयविकाराचा झटका, अवयव निकामी होणे आणि ब्रेन स्ट्रोक यांसारख्या जीवघेण्या आजारांचा धोका वाढतो.
-
हिवाळ्यात मधुमेहाच्या रुग्णांची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊ लागते आणि यामुळेच समस्या आणखी वाढू लागते.
-
हिवाळ्यात मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी सुक्या मेव्याचे सेवन खूप प्रभावी ठरते. सुक्या मेव्यांमध्ये पिस्ता हे असेच एक ड्रायफ्रुट आहे जे मधुमेहाच्या रुग्णांसाठी अमृतासमान ठरू शकते.
-
पोषक तत्वांनी युक्त पिस्ता रोगप्रतिकार शक्ती मजबूत करतात आणि शरीराला रोगांपासून वाचवतात. सुका मेवा हे पोषक तत्वांचे पॉवरहाऊस आहेत. दररोज ठराविक प्रमाणात सुक मेवा खाल्ल्याने शरीर निरोगी राहते.
-
पिस्ता हा एक सुपर हेल्दी नट आहे जो मधुमेहासाठी अनुकूल आहे. पिस्त्याचे योग्य प्रमाणात सेवन केल्यास रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत होते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी पिस्त्याचे सेवन किती फायदेशीर आहे हे जाणून घेऊया.
-
कोणत्याही पदार्थाचा ग्लायसेमिक इंडेक्स रक्तातील साखरेच्या पातळीवर परिणाम करतो. कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेले पदार्थ मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर असतात.
-
पिस्त्यामध्ये कमी ग्लायसेमिक इंडेक्स असते ज्यामुळे ते मधुमेहींसाठी उपयुक्त ठरते. पिस्ता खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी कमी होण्यास मदत होते, असे अनेक संशोधनांमध्ये समोर आले आहे.
-
पोषणतज्ञ लेखक आणि सल्लागार, डॉ. माईक रौसेल यांच्या मते, मधुमेहींना पिस्ते खाल्ल्यास त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी वाढणार नाही. जेवणापूर्वी पिस्ते खाल्ल्याने जेवणानंतर शरीरातील मधुमेहाची प्रतिक्रिया नियंत्रित करता येते.
-
पिस्त्यामुळे रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉलची पातळीही नियंत्रित राहते. याचे सेवन केल्याने हृदयाचे आरोग्य चांगले राहते. तज्ज्ञांच्या मते, तुमच्या शारीरिक स्थितीनुसार तुम्ही पिस्त्याचा मर्यादित वापर करू शकता.
-
येथे देण्यात आलेली माहिती गृहितके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. (सर्व फोटो: Freepik)
IND vs ENG : स्वत:ची विकेट पाहून अक्षरही अवाक्, गिलने तर डोक्यालाच लावला हात; आदिलच्या जादुई चेंडूचा VIDEO व्हायरल