-
मधुमेहाच्या रुग्णांना खाण्यापिण्यात सर्व प्रकारची खबरदारी घेण्याचा सल्ला दिला जातो. खाण्यापिण्याच्या बाबतीत थोडासा निष्काळजीपणा रक्तातील साखर वाढवू शकतो आणि त्याचा परिणाम घातक ठरू शकतो.
-
तज्ज्ञांच्या मते, या रुग्णांनी, ते कोणते तेल आणि कोणत्या प्रमाणात खात आहेत हेही लक्षात घेणे आवश्यक आहे.
-
सॅच्युरेटेड फॅटच्या श्रेणीत येणारे तेल मधुमेहाच्या रुग्णांसाठी अत्यंत हानिकारक ठरू शकतात. त्याचा हृदयावरही वाईट परिणाम होतो.
-
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, सॅच्युरेटेड फॅट शरीरातील खराब कोलेस्टेरॉल वाढवते. याला लो डेन्सिटी लिपोप्रोटीन (LDL) असेही म्हणतात. यामुळे रक्तातील साखरेव्यतिरिक्त हृदयाशी संबंधित आजारांचा धोका वाढतो.
-
डायबिटीज स्पेशॅलिटी सेंटरचे अध्यक्ष आणि देशातील सुप्रसिद्ध मधुमेह तज्ज्ञ डॉ. व्ही मोहन म्हणतात की पाम तेल आणि खोबरेल तेल यांसारखे तेल मधुमेहाच्या रुग्णांसाठी अतिशय धोकादायक आहे कारण त्यात सॅच्युरेटेड फॅट आढळते.
-
याचा सरळ अर्थ असा आहे की आपल्या आहारातील चरबीचे प्रमाण ३०% पेक्षा कमी असावे. चरबीमुळे साखरेची तात्काळ वाढ होत नसली तरीही ती शरीराचे दीर्घकाळात नुकसान करते.
-
डॉ. व्ही मोहन म्हणतात की, मधुमेहाच्या रूग्णांवर केलेल्या विस्तृत संशोधनामध्ये असे आढळून आले आहे की प्रामुख्याने तीन प्रकारचे तेल मधुमेहाच्या रूग्णांसाठी फायदेशीर आहेत. ते तेल मोनो-सॅच्युरेटेड फॅटी अॅसिड श्रेणीमध्ये मोडते.
-
मधुमेहाच्या रूग्णांसाठी फायदेशीर तेल
-
शेंगदाण्याचे तेल
-
मोहरीचे तेल
-
तिळाचे तेल
-
डॉ. मोहन यांच्या म्हणण्यानुसार मधुमेहाचे रूग्ण आपल्या आहारात राईस ब्रॅन ऑइल, सूर्यफुलाचे तेल किंवा मक्याच्या तेलाचा समावेश करू शकतात. हे तेल पॉली अन-सॅच्युरेटेड फॅटी अॅसिड श्रेणीमध्ये मोडतात.
Chhaava Deleted Scene : ‘छावा’ चित्रपटातील डिलीट केलेला सीन व्हायरल, जबरदस्त संवाद ऐकून अंगावर येईल काटा