-
रेल्वेला भारताची लाईफलाईन (Indian Railways) म्हटले जाते. दररोज कोट्यवधी लोक रेल्वेने प्रवास करतात.
-
भारतीय रेल्वेने प्रत्येक गोष्टीचे नियम ठरवले आहेत.
-
तुम्हीही सतत रेल्वेने प्रवास करत असाल तर ही तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे.
-
रेल्वेने प्रवास करताना काही नियम आहेत त्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. रेल्वेचे नियम मोडल्यास तुम्हाला दंड भरावा लागेल.
-
तुम्ही जर या नियमांकडे दुर्लक्ष केल्याबद्दल तुम्हाला तुरुंगातही जावे लागू शकते.
-
जर तुम्ही भारतीय रेल्वेने वारंवार प्रवास करत असाल, तर या नियमांचे पालन करा.
-
रेल्वेच्या नियमांनुसार, कोणी विनापरवाना रेल्वे किंवा रेल्वेच्या परिसरात मालाची विक्री किंवा फेरी मारल्यात तो गुन्हा मानला जाईल. असे केल्यावर, भारतीय रेल्वे नियमाच्या कलम १४४ अंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. दोषी आढळल्यास १ वर्षाचा तुरुंगवास आणि २ हजार रुपयांपर्यंतचा दंड भरावा लागू शकतो.
-
अनेक वेळा असे घडते की, काही लोक आपली जागा सोडून इतर डब्यातून आपल्या कुटुंबीय किंवा मित्रांसह प्रवास करतात. अशा प्रकरणात, त्या व्यक्तीवर रेल्वे कायद्यांतर्गत कारवाई केली जाऊ शकते आणि लांब पल्ल्याच्या भाड्यासह २५० रुपये दंड देखील आकारला जाऊ शकतो.
-
रेल्वेद्वारे तिकीटांची विक्री फक्त नोंदणीकृत काउंटर किंवा अधिकृत एजंटद्वारे केली जाते. अशा परिस्थितीत जर कोणी प्रवाशाला परवानगीशिवाय तिकीट विकले तर त्याला १०,००० रुपये दंड आणि रेल्वे कायद्याच्या कलम १४३ नुसार ३ वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो.
-
रेल्वे वेटिंग तिकिटावर प्रवास करू देत नाही. कन्फर्म तिकिटावरच प्रवास करता येतो. तसेच, जर ट्रेन रद्द केली गेली असेल, तर त्या तिकिटावर दुसऱ्या ट्रेनने प्रवास करण्याची परवानगी नाही. अशा परिस्थितीत, जर कोणी असे केले तर, TTE तुमच्याकडून तिकिटाच्या रकमेसह संपूर्ण भाडे आकारते. दंड २५० रुपये असू शकतो आणि TTE तुम्हाला पुढच्या स्टेशनवर देखील सोडू शकते.
-
जर एखाद्या प्रवाशाने ट्रेनच्या छतावर बसून प्रवास केला तर त्याला तुरुंगात जावे लागू शकते. ट्रेनच्या छतावर प्रवास करणे गुन्ह्याच्या श्रेणीत गणले जाते. त्याच्यावर रेल्वे कायद्याच्या कलम-१५६ अंतर्गत कारवाई केली जाईल. अशा प्रकरणांमध्ये ३ महिने तुरुंगवास आणि ५०० रुपयांपर्यंत दंडाची शिक्षा भोगावी लागेल.
-
रेल्वेने प्रवास करताना वरील सांगितलेल्या गोष्टी टाळा. (फोटो सौजन्य-संग्रहित छायाचित्र))

२७ फेब्रुवारी पंचांग: दर्श अमावस्येला कर्क, मीन राशीला होईल ‘या’ रूपात लाभ; तुमच्या आयुष्यात आज काय घडणार? वाचा राशिभविष्य