-
नवीन वर्षाला सुरुवात झाली आहे. हे वर्ष आपल्याला कसं जाईल, असा प्रश्न प्रत्येक व्यक्तीला पडला आहे.
-
या नव्या वर्षात आपल्या आयुष्यात काय नवीन होईल किंवा काय चांगलं काम होणार, हे जाणून घेण्याची उत्सुकता प्रत्येकालाच लागली आहे.
-
ज्योतिषशास्त्रानुसार, या नव्या वर्षात ग्रहांची उलथापालथ होणार आहे. याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. नव्या वर्षाच्या सुरुवातीला न्यायदेवता शनिदेव राशी बदल करणार आहे.
-
शनिदेव स्वत:च्या कुंभ राशीत गोचर करणार आहे. त्यानंतर शुक्र आणि सूर्यही राशी बदल करणार आहे. सूर्यदेव १४ जानेवारीला धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करणार आहे. तर शुक्र ग्रह २२ जानेवारीला कुंभ राशीत विराजमान होणार आहे.
-
या महिन्यात काही राशींच्या करिअर, नोकरी आणि व्यवसायात प्रगती होण्याची शक्यता आहे. त्यांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळण्याची शक्यता आहे.
-
येणारा प्रत्येक दिवस हा काही राशीतील लोकांच्या आयुष्यात नवनवीन संधी घेऊन येणारा असू शकतो. तुम्हाला तुमच्या नोकरीमध्ये बंपर लाभ मिळण्याची शक्यता आहे.
-
या महिन्यात नोकरी करणाऱ्या लोकांची पदोन्नती होण्याचीही शक्यता आहे. त्यातही या महिन्यात व्यवसाय करणाऱ्या लोकांना चांगल्या संधी उपलब्ध होण्याचीही शक्यता आहे.
-
हा पहिलाच महिना काही राशींसाठी प्रचंड धनलाभ घेऊन येणारा ठरणारा असू शकतो. चला तर जाणून घेऊया जानेवारी महिन्यात कोणत्या राशींच्या लोकांचे नशीब खुलणार.
-
या महिन्यात वृश्चिक राशीच्या लोकांना करिअरच्या दृष्टीने चांगले परिणाम मिळण्याची शक्यता आहे. सूर्य आणि बुध यांच्या संयोगामुळे तुम्हाला चांगल्या संधी मिळू शकतात. तसेच या महिन्यात तुमचा पगार वाढण्याचीही शक्यता आहे. त्याचबरोबर काही लोकांना परदेशात नोकरीची संधीही मिळू शकते.
-
या महिन्यात बृहस्पति दशम भावात असेल, त्यामुळे तुमचे व्यावसायिक जीवन चांगले राहण्याची शक्यता आहे. तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर जानेवारी महिना तुमच्यासाठी खूप चांगला असण्याची शक्यता आहे. या महिन्यात तुम्हाला नक्कीच यश मिळू शकतो. दुसरीकडे, जे लोक नोकरी करत आहेत, त्यांनाही चांगले परिणाम मिळण्याची शक्यता आहे.
-
कुंभ राशीचे लोक करिअरच्या क्षेत्रात वर्षाच्या पहिल्याच महिन्यात चांगली कामगिरी करण्याची शक्यता आहे. मंगळ दशम भावात असेल, ज्यामुळे तुम्हाला धन आणि प्रतिष्ठा मिळण्याचे प्रबल योग बनले आहेत. तुमचा सर्वोत्तम काळ महिन्याच्या १५ तारखेनंतर येण्याची शक्यता आहे. नोकरीत बढती आणि पगार वाढण्याची शक्यता आहे.
-
(टीप: वरील लेख हा गृहीतके व प्राप्त माहितीवर आधारित आहे)

Dr. Ambedkar Jayanti: डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रियजनांना WhatsApp, Instagram, Facebook वर पाठवा ‘या’ खास मराठमोळ्या शुभेच्छा; पोस्ट करा सुंदर HD Images