-
मधुमेह हा असा एक आजार आहे जो खराब जीवनशैली आणि अयोग्य आहार यामुळे विकसित होतो. वाढत्या वयात यांचा धोका आणखीनच वाढतो.
-
मात्र एक धक्कादायक माहितीनुसार आता लहान मुले देखील मधुमेहग्रस्त होऊ लागली आहेत. गेल्या वीस वर्षांत भारतासह जगभरातील मुलांमध्ये टाइप-१ मधुमेह आणि टाइप-२ मधुमेहाचा दर वाढू लागला आहे.
-
चुकीचा आहार, जीवनशैली, लठ्ठपणा आणि मधुमेहाचे कौटुंबिक इतिहास लहान मुलांमधील मधुमेह वाढण्यासाठी कारणीभूत ठरतो. जेव्हा शरीर पर्याप्त इन्सुलिनचे उत्पादन करत नाही किंवा त्याच्या योग्य वापर करण्यास अक्षम ठरते तेव्हा लहान मुलांमधील मधुमेह वाढू लागतो.
-
इंटरनॅशनल डायबिटीज फेडरेशनच्या अहवालानुसार २०१९ पर्यंत भारतामध्ये मधुमेहाचे ७.७ कोटी रुग्ण आहेत. याशिवाय भारत २०-८० वयोगटातील मधुमेह रुग्णांच्या संख्येत जगामध्ये दुसऱ्या स्थानावर आहे.
-
मुलांमधील टाइप १ मधुमेह प्रकारामध्ये शरीर इन्सुलिनचे उत्पादन करत नाही. यावर काही उपचार नसला तरीही यावर नियंत्रण मिळवणे शक्य आहे. मुलांमध्ये, सतत तहान लागणे, वारंवार लघवीला होणे, उलटी होणे, सुस्ती आणि खूप भूक लागणे यासारखी लक्षणे दिसल्यास लगेचच रक्ताची तपासणी करून घ्यावी.
-
डॉक्टर बृज मोहन मक्कर यांच्यानुसार १४ ते २० वयोगटातील मुलं टाइप २ माधुमहयाच्या विळख्यात अडकतात. मागील दहा वर्षात या वयोगटातील मधुमेह रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. मुलांमधील मधुमेहाच्या प्रकरणातील जवळपास १२ ते २५ टक्के रुग्ण टाइप २ मधुमेहाचे आहेत.
-
डॉक्टर मक्कर यांच्यानुसार लहान मुलांमधील लठ्ठपणाचा दर वाढू लागला आहे. जर गर्भवती महिला लठ्ठ असेल तर मुलाला किशोरावस्थेत टाइप २ मधुमेह होण्याची शक्यता जास्त असते.
-
एका अहवालानुसार देशातील २० ते ७० वयोगटाच्या लोकसंख्येतील ८.७ टक्के लोक मधुमेहग्रस्त आहेत. मधुमेह अनेक कारणांनी होऊ शकतो. यामुळे यापासून स्वतःचा आणि आपल्या मुलांचा बचाव करण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करणे गरजेचे आहे.
-
लहान मुलांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करणे अतिशय आवश्यक आहे. कारण यावर वेळीच आळा घातला नाही तर त्याचे परिणाम गंभीर होऊ शकतात. यामुळे वयाच्या ३५ व्या वर्षानंतर अनेक समस्या उद्भवू शकतात आणि संपूर्ण आयुष्य प्रभावित होऊ शकते.
-
मुलांचा मधुमेहापासून बचाव करण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.
-
मुलांना सक्रिय ठेवा आणि त्यांना मैदानी खेळ खेळण्यास प्रोत्साहन द्या.
-
मुलांचे वजन वाढणार नाही याची काळजी घ्या.
-
मुलांच्या आहारावर लक्ष द्या. त्यांना जंक फूडचे सेवन करण्यापासून प्रतिबंध करा.
-
मुलांचा मोबाईल, टीव्ही यावरील स्क्रीन टाइम १ ते २ तासांपेक्षा अधिक नसेल यांची खबरदारी घ्या.
-
(Photos: Pexels)
पत्नी, मुलासमोर दहशतवाद्यांनी डोंबिवलीतील पर्यटकाच्या डोक्यात गोळ्या झाडल्या, मुलावर वडिलांचा मृतदेह पाहण्याची वेळ