-
पपई (Papaya) हे अतिशय उपयुक्त फळ आहे. यामुळे पोटाच्या विविध समस्या दूर होऊ शकतात. त्यामुळे अनेकजण वर्षभर पपई खाण्याचा सल्ला देतात.
-
पपईच्या फायद्यांबद्दल आपल्या सर्वांनाच माहित आहे. पपई हे फळ खाण्यास खूप चविष्ट आहेच, तसेच आरोग्यासाठीही फायदेशीर आहे.
-
पपईमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आहेत. ज्यामुळे पपईच्या झाडाचा प्रत्येक भाग आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
-
हिवाळ्यात पपईचे सेवन करणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. याचे कारण म्हणजे पपईचा उबदार प्रभाव जो थंडीत शरीराला आतून उबदार करतो. (फोटो: freepik)
-
विशेषत: हिवाळ्यात पपई खाल्ल्याने तुम्हाला अनेक आजारांपासून वाचवता येते. पपईचे पाणीही तितकेच फायदेशीर आहे. (फोटो: freepik)
-
पपईमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. म्हणूनच या फळाला रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे फळ असेही म्हणतात. यामुळेच रोगप्रतिकारशक्ती वाढवताना डॉक्टर पपई खाण्याचा सल्ला देतात.
-
पपईमध्ये असलेले लाइकोपीन कर्करोगाचा धोका कमी करू शकते. कर्करोगावर उपचार घेत असलेल्या लोकांनाही पपई खाल्ल्याने फायदा होऊ शकतो.
-
पपईमध्ये असलेले पॅपेन एन्झाइम प्रोटीन्सचे पचन सुलभ करते. बद्धकोष्ठतेच्या वेळीही अनेकजण घरगुती उपाय म्हणून पपईचे सेवन करतात.
-
पपईमध्ये व्हिटॅमिन ए, कॅल्शियम, फायबर, मॅग्नेशियम, लोह, अँटी-ऑक्सिडंट्स इत्यादी गुणधर्म असतात. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर पपई खाणं खूपच फायदेशीर ठरते.
-
जर तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल आणि तुमच्या रक्तातील साखर नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत असाल तर पपईचे पाणी तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.
-
पपईचे पाणी डोळ्याकरता खूप फायद्याचे आहे. पपईच्या पाण्यात ल्युटीन, झेक्सॅन्थिन, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई असते, जे वय-संबंधित मॅक्युलर डिजेनेरेशन आणि मोतीबिंदूशी लढण्यास मदत करू शकते.
-
आरोग्याबरोबरच सौंदर्य वाढविण्यासाठी पपई प्रभावी मानली जाते. पपईचे पाणी प्यायल्याने डेड स्किन सेल्स साफ होण्यास मदत होते. चेहऱ्यावरील डाग, मुरुम, सुरकुत्या इत्यादी समस्या दूर होतात.
(फोटो: संग्रहित छायाचित्र)
Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”