-
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, कोणताही ग्रह ज्यावेळेस राशी किंवा नक्षत्र परिवर्तन करतो तेव्हा त्याचा प्रभाव मानवी जीवनावर होत असतो.
-
वैदिक ज्योतिषशास्त्र अभ्यासकांच्या माहितीनुसार येत्या मकरसंक्रांतीला म्हणजेच १४ जानेवारीला शनिदेव व वैभवदाता शुक्र एकाच राशीत म्हणजेच मकर मध्ये एकत्र येणार आहेत.
-
शनि व शुक्र यांच्या मैत्रीपूर्ण भाव असल्याने या युतीचा काही राशींना प्रचंड लाभ होऊ शकतो. केवळ प्रगतीच नव्हे तर धनलाभाच्या सुद्धा मोठ्या प्रबळ संधी आपल्याला लाभू शकतात.
-
ज्योतिष शास्त्रात शनीच्या राशी बदलाला खूप महत्त्व असतं. कारण शनि माणसाला त्याच्या कर्मानुसार फळ देतो. असे म्हटले जाते.
-
या नव्या वर्षामध्ये शनीचे राशी परिवर्तन काही राशींसाठी शुभ असेल. त्यांना अनेक चांंल्या संधी मिळणार असल्याची शक्यता आहे.
-
चला तर जाणून घेऊया शनि व शुक्र यांच्या युतीमुळे कोणत्या राशींतील लोकांना अपार धनलाभ मिळण्याची शक्यता आहे.
-
शुक्र आपल्या राशीच्या नवव्या स्थानी गोचर करणार आहे हे स्थान भाग्य व परदेश वारीशी संबंधित आहे. यामुळे ज्यांना परदेशवारीची इच्छा आहे त्यांना लवकरच संधी मिळू शकते. आपल्या इच्छा पूर्ण करणारा हा लाभदायक काळ असू शकतो. करिअरमध्ये प्रचंड प्रगतीसाठी काही निर्णय घेणे आवश्यक असेल तुमच्या मनाचा कौल ऐकणे फायद्याचे ठरू शकते. आपल्याला वाडवडिलांकडून प्रचंड धनलाभ होऊ शकतो.
-
कन्या राशीसाठी शुक्र व शनिची युती अत्यंत लाभदायक सिद्ध होऊ शकते. आपल्या राशीच्या सप्तम भावात शनि व शुक्राची युती तयात होत आहे. हे स्थान पार्टनरशिपचे व प्रेमाचे मानले जाते. यामुळे येत्या काळात आपल्याला प्रचंड प्रेम मिळणार असल्याचे संकेत आहेत. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे तुम्हाला जोडीदाराच्या माध्यमातून सर्वाधिक धनलाभ होण्याची शक्यता आहे.
-
शनि आणि शुक्राचा संयोग मकर राशीतच होत असल्याने अशा परिस्थितीत त्याचा जास्तीत जास्त परिणाम मकर राशीच्या लोकांवर होईल आणि तो खूप सकारात्मकही असेल. भक्कम पैसा मिळू शकतो. उत्पन्नाचे साधन वाढेल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. अडकलेले पैसे मिळू शकतात. तुमच्या करिअरमध्ये चांगले दिवस सुरू होतील, जे भविष्यात अधिक फायदे देतील.
-
कुंभ राशीत शनीचे संक्रमण होण्यापूर्वीच शनि आणि शुक्र या राशीच्या राशीच्या लोकांना जोरदार लाभ देऊ शकतात. हे लोक त्यांच्या करिअरमध्ये प्रगती करू शकतात. आर्थिक आघाडीवरही वेळ लाभदायक राहील. या वेळेचा पुरेपूर आनंद घ्या.
-
(टीप: वरील लेख हा गृहीतके व प्राप्त माहितीच्या आधारे लिहिण्यात आला आहे)

Aajche Rashi Bhavishya : चार चौघात सन्मान ते प्रचंड धनलाभ; तुमच्या राशीसाठी शिवयोग ठरणार का शुभ? वाचा राशिभविष्य