-
ज्योतिषशास्त्रानुसार सर्वच ग्रह वेळोवेळी राशी परिवर्तन करून युती तयार करतात. या परिवर्तनाचा प्रभाव मानवी जीवनावर आणि सर्व राशींवर पडत असतो.
-
त्याचबरोबर या युती काही राशींसाठी शुभ सिद्ध होते तर काहींसाठी अशुभ. १४ जानेवारीला सूर्यदेव मकर राशीमध्ये प्रवेश करणार आहेत. तसेच, या राशीमध्ये त्रिग्रही योग तयार होणार आहे.
-
मकर राशीमध्ये शनिदेव, सूर्यदेव आणि शुक्रदेवाच्या युतीमुळे हा योग तयार होणार आहे. या योगाचा प्रभाव सर्वच राशींवर पाहायला मिळेल. मात्र तीन राशींच्या लोकांना या योगामुळे आर्थिक लाभ होण्याची संभावना आहे. या राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया.
-
कर्क राशीच्या लोकांना तीन ग्रहांच्या युतीमुळे तयार होणारा त्रिग्रही योग फलदायी सिद्ध होऊ शकतो. हा योग कर्क राशीच्या संक्रमण कुंडलीच्या सातव्या घरात तयार होणार असून याला वैवाहिक जीवनाचे आणि भागीदारीचे स्थान मानले जाते.
-
यामुळेच कर्क राशीचे लोक या काळामध्ये भागीदारीमध्ये एखादा व्यवसाय सुरू करू शकतात. त्याचबरोबर नोकरदारांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळून त्यांची कार्यक्षेत्रात प्रगती होऊ शकते.
-
तसेच, जे लोक अविवाहित आहेत त्यांचे लग्न जमू शकते. कौटुंबिक जीवनातही आनंदाचे वातावरण राहील.
-
१४ तारखेला मकर राशीत तयार होणारा त्रिग्रही योग मेष राशीच्या लोकांसाठी लाभदायी सिद्ध होऊ शकतो. मेष राशीच्या संक्रमण कुंडलीच्या दहाव्या स्थानावर हा योग तयार होत आहे. याला नोकरी आणि कार्यक्षेत्राचे स्थान मानले जाते.
-
व्यावसायिकांसाठी हा योग आर्थिकदृष्ट्या शुभ सिद्ध होऊ शकतो. याकाळात मेष राशीचे लोक अधिकाधिक धन कमावू शकतात. त्याचबरोबर व्यवसाय विस्तारही होऊ शकतो.
-
तसेच जे लोक नोकरीच्या शोधात आहे, त्यांची इच्छा पूर्ण होऊ शकते. अशाचप्रकारे नोकरदार लोकांचे कामाच्या ठिकाणी कौतुक होऊ शकते. त्यांना वरिष्ठ आणि कनिष्ठ सहकाऱ्यांची मदत मिळू शकते.
-
मिथुन राशीच्या लोकांना तयार होणारा त्रिग्रही योग फायदेशीर सिद्ध होऊ शकतो. या राशीच्या संक्रमण कुंडलीच्या आठव्या घरात हा योग तयार होणार आहे. म्हणूनच या काळात या लोकांना एखाद्या जुन्या आजारातून आराम मिळू शकतो.
-
जे लोक संशोधनशी निगडीत कार्याशी निगडीत आहे त्यांना ही वेळ लाभदायक ठरेल. उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होऊ शकतात.
-
येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”