-
प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते की तिच्या सुंदर चेहऱ्यावर मुरमे म्हणजेच पिंपल्स येऊ नयेत. मात्र, कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चेहऱ्यावर पिंपल्स येतातच. यामागे अनेक कारणे असली तरीही झोपेची पद्धतही पिंपल्स येण्यामागचं कारण असू शकतं.
-
झोपेच्यावेळेस केलेल्या सामान्य चुकांमुळे चेहऱ्यावर पिंपल्स येण्याची समस्या वाढू लागते. आज आपण याच चुका आणि त्यावर करायचे उपाय जाणून घेणार आहोत.
-
पोटावर झोपण्याची सवय चेहऱ्यावर पिंपल्स येण्याचे कारण बनू शकते. अशा अवस्थेत झोपल्याने आपली त्वचा थेट उशीच्या कव्हरच्या संपर्कात येते. यामुळे त्वचा आणि उशीमध्ये घर्षण होऊन पिंपल्स आणि त्वचेच्या इतर समस्या वाढू शकतात.
-
केसांच्या निरोगी आरोग्यासाठी त्यांना नियमित तेल लावणे चांगले असते. मात्र याचा आपल्या त्वचेवर वाईट परिणाम होऊ शकतो. विशेषतः तेलकट त्वचा असणाऱ्यांनी रात्री केसांना तेल लावून झोपू नये.
-
रात्री झोपताना केसांना तेल लावल्यास हे तेल चेहऱ्यावर उतरते आणि जास्त सीबममुळे त्वचेवर पिंपल्स येतात. केसांना पोषण देण्यासाठी केस धुण्याच्या दोन तास आधी कोमट तेलाने केसांना मसाज करावा.
-
त्वचेच्या स्वच्छतेसाठी योग्य क्लीनजर योग्य पद्धतीने वापरणे अतिशय गरजेचे आहे. याच प्रमाणे चेहरा धुतल्यानंतर चेहरा पुसण्यासाथी वापरायचा टॉवेलही स्वच्छ असणे गरजेचे आहे.
-
जर तुम्ही तुमचा चेहरा पुसण्यासाठी खराब टॉवेलचा वापर करत असाल तर तुमच्या चेहऱ्यावरील पिंपल्स वाढू शकतात. म्हणूनच चेहरा धुतल्यावर तो पुसण्यासाठी स्वच्छ टॉवेलचा वापरण्याची सवय लावून घ्यावी.
-
एखाद्या कार्यक्रमातून रात्री उशिरा घरी आल्यावर बहुतेक मुली चेहऱ्यावरील मेकअप न काढता तशाच झोपून जातात. मात्र मेकअप चेहऱ्यावर तसंच ठेवून झोपणे त्वचेसाठी हानिकारक आहे.
-
मेकअपच्या उत्पादनातील रसायनांचे कण रात्रभर चेहऱ्यावरील छिद्र बंद करतात आणि त्यामुळे पिंपल्सची समस्या वाढते. म्हणूनच तुम्ही कितीही थकलेले असाल तरीही रात्री उशिरा बाहेरून आल्यावर चेहरा अवश्य धुवावा.
-
ज्याप्रमाणे आपण आपले कपडे नियमित धुतो त्याचप्रमाणे आपण आपल्या उशीचे कव्हरही नियमितपाने धुवायला हवेत. उशीचे कव्हर हे अतिशय अस्वच्छ असतात आणि त्यातून किटाणू पासरण्याची शक्यता अधिक असते.
-
या उशीवर जेव्हा आपण झोपतो तेव्हा कव्हरवर असलेले बॅक्टेरिया आपल्या त्वचेत जातात आणि यामुळे पिंपल्स येतात. म्हणूनच जर तुम्हाला पिंपल्सपासून त्वचेचे रक्षण करायचे असेल तर उशीचे कव्हर नियमितपणे बदला.
-
(सर्व फोटो: Freepik)

३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख