-
मकर संक्रांत हा महाराष्ट्राप्रमाणेच उत्तर भारतातील मोठा सण आहे. या सणाला दान करण्याचा सण मानला जातो. ज्या वेळी हा सण येतो, त्या वेळी उत्तर भारतात थंडी असते. गूळ आणि तीळ या दोन्हींचा प्रभाव खूप गरम असतो.
-
थंड वातावरणापासून शरीराचे रक्षण व्हावे यासाठी तीळ-गूळ खाल्ले जातात. तीळ उष्ण असल्याने थंडीमध्ये शरीरातील उष्णता टिकवून ठेवण्यासाठी त्यांचा वापर केला जातो. ज्यांना थंडीचा जास्त त्रास होतो त्यांनी थंडीत अवश्य तीळ खावे.
-
मकर ही शनिदेवाची रास आहे. हिंदू धर्मात शनिदेवाला सूर्यदेवाचा पुत्र म्हटले जाते. अशा स्थितीत मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेव आपला मुलगा शनिदेवाच्या घरी जातो असे मानले जाते. शनीच्या घरी जाताना सूर्य इतका तेजस्वी होतो की त्याच्यासमोर शनीचे तेजही मावळते.
-
ज्योतिषशास्त्रात काळ्या तिळाचा संबंध शनिदेवाशी आणि गुळाचा संबंध सूर्यदेवाशी मानला जातो. संक्रांतीच्या दिवशी सूर्य देव मकर राशीत शनिदेवाच्या घरी जातो, अशा स्थितीत काळे तीळ आणि गुळाचे लाडू सूर्य आणि शनी यांच्यातील मधुर नाते दर्शवतात.
-
ज्योतिषशास्त्रात सूर्य आणि शनि हे दोन्ही ग्रह बलवान मानले जातात.अशा वेळी काळे तीळ आणि गुळाचे लाडू दान करून आणि प्रसाद स्वरूपात खाल्ल्यास शनिदेव आणि सूर्यदेव दोघेही प्रसन्न होतात आणि त्यांच्या कृपेने घरात सुख-समृद्धी येते.
-
वास्तविक मकर संक्रांत हा उत्तर भारतातील मोठा सण मानला जातो. ज्या वेळी हा सण येतो, त्या वेळी उत्तर भारतात थंडी असते. गूळ आणि तीळ या दोन्हींचा प्रभाव खूप गरम असतो.
-
लोक थंडीच्या प्रभावापासून वाचण्यासाठी गूळ आणि तीळाचे लाडू खाल्ले जातात. तयामुळे त्यांच्या शरीराला ऊब मिळते आणि त्यांची प्रतिकारशक्ती मजबूत होते.
-
हिवाळ्यात तीळ खाण्याचे इतर फायदे जाणून घेऊया.
-
हिवाळ्यात त्वचा कोरडी पडायला सुरुवात होते. ज्यांची त्वचा जास्त कोरडी पडते त्यांनी हिवाळ्याला सुरुवात झाली की लगेचच आपल्या आहारात तिळाचा समावेश करावा. त्यामुळे त्वचेचा कोरडेपणा कमी होतो.
-
तिळाच्या तेलाने मसाज केल्यास त्वचा मऊ मुलायम होते. तसंच दुधामध्ये तीळ भिजवून त्याची पेस्ट करून ते चेहऱ्यावर लावल्यास चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते.
-
थंडीमध्ये हाडांची दुखणी वाढतात. विशेषत: ज्यांना संधिवात, सांधेदुखीचा त्रास आहे त्यांचा त्रास तर आणखीनच वाढतो. बहुतेकांना थंडीमध्ये पाय दुखण्याचा किंवा गुडघेदुखीचा त्रास जाणवतो. अशावेळेस तिळाचा आहारात समावेश केला तर त्रास खूप कमी होतो.
-
रोजच्या जेवणात तिळाची चटणी, तिळकूटाचा वापर केल्यानं सांधेदुखी, स्नायूंची दुखणी कमी होतात. तिळात असलेली कॅल्शियम आणि फॉस्फरससारखी पोषणमूल्ये हाडांच्या मजबुतीसाठी अत्यंत उपयुक्त असतात.
-
थंडीत तीळ नियमित खाल्ल्यास स्नायू दुखणं आणि सूज येण्याचा त्रास कमी होतो.
-
तीळ आपल्या मेंदूसाठीही चांगले असतात. तिळामध्ये प्रथिने, खनिजे, कॅल्शियम, मॅग्नेशियम, आयर्न आणि कॉपरसारखी अनेक पोषणमूल्ये आहेत. यामुळे मेंदूची क्षमता वाढते. थंडीत आपल्या जेवणात रोज तीळ खाल्ल्यास स्मरणशक्तीही चांगली राहते असं तज्ज्ञ सांगतात.
-
ज्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे त्या महिलांनी आहारात तिळाचा समावेश केलाच पाहिजे. तिळामध्ये मॅग्नेशियम भरपूर असतं. त्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते. अर्थात डॉक्टरांचा सल्ला घेऊनच तीळ योग्य प्रमाणात खाल्ले जावेत.
-
तीळ आपल्या ह्रदयाच्या आरोग्यासाठीही खूप चांगले आहेत. त्यामुळे थंडीत तिळाचा वापर आपल्या रोजच्या जेवणात करायलाच हवा. यामध्ये आयर्न, मॅग्नेशियम, सेलनियम आणि झिंकसारखी पोषणमूल्य असतात.
-
ज्यांचं कोलेस्ट्रॉल वाढलेलं आहे. त्यांच्यासाठी तीळ खाणं फायदेशीर आहे. यामुळे कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. तीळ खाल्ल्याने ह्रदयाचे स्नायूही मजबूत होतात आणि ह्रदविकाराचा धोका कमी होतो.
-
अनेकांना थंडीमध्ये झोप न लागण्याचा त्रास होतो. तिळाचा आहारात समावेश केला तर झोप न येण्याची समस्या दूर होऊ शकते असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
-
तिळामधील काही घटकांमुळे चांगली झोप येण्यास मदत होते. त्याचबरोबर तिळाच्या सेवनाने तणाव आणि डिप्रेशन कमी होण्यासही मदत होते.
-
दातांसाठीही तीळ खाणं चांगलं आहे. सकाळी ब्रश केल्यानंतर तीळ चावून खाल्ल्यानं दात मजबूत होतात. हिरड्यांमधून होणाऱ्या रक्तस्त्रावावरही तीळ गुणकारी आहेत. सतत तोंड येण्याचा त्रास होत असेल तर तिळाच्या तेलात सैंधव मीठ मिसळून ते लावल्यानं आराम पडू शकतो.
-
लघवी स्वच्छ होत नसेल तर तीळ, दूध आणि खडीसाखर एकत्र करून घेतल्यास त्यानं मूत्राशय मोकळे होण्यास मदत होते.
-
बाळंत स्त्रीला पुरेसे दूध येत नसल्यास तिला दूधात तीळ घालून ते प्यायला द्यावे. यामुळे पुरेसे दूध येण्यास उपयोग होतो. (Photos: Freepik)
![Mangal Gochar 2024](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/New-Project-2024-07-24T185145.333-1.jpg)
येणाऱ्या ४७ दिवसात मंगळ देणार गडगंज श्रीमंती; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार