-
नवीन वर्ष सुरु झाले की, सर्वात पहिला सण येतो तो म्हणजे सर्व महिला वर्गांचा आवडता मकर संक्रांत. यावेळेस महिला हळदीकुंकूवाचा कार्यक्रम आयोजित करतात.
-
हळदीकुंकूला देण्यात येणारे वाण (Vaan) नेमके काय द्यावे? असा अनेकदा महिलांना प्रश्न पडतो. चला तर जाणून घेऊया हळदीकुंकवाच्या वाणासाठी काही हटके पर्याय.
-
आरसा – बाजारात सध्या बरेच वेगवेगळ्या प्रकारचे डिझायनर आरसे मिळतात. असाच एखादा आरसा तुम्ही सुवासिनींना वाण म्हणून देऊ शकता.
-
रेसिपी बुक – महिलांना स्वयंपाकासाठी मदत करणारे एखादं छानसं रेसिपी बुक वाण म्हणून देवू शकता. यामुळे सुवासिनींना आनंदी होणार.
-
तुळशीचं रोपटं – तुळस ही सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक मानली जाते. ज्या घरात तुळस आहे तिथे लक्ष्मीचाही वास असतो. त्यामुळे तुम्ही हळदीकुंकवाचं वाण म्हणून तुळशीचं रोप देऊ शकता.
-
कापडांच्या पिशव्या – प्लॅस्टिक बंदी असल्यामुळे तुम्ही कापडाच्या पिशव्या हळदीकुंकवाच्या वाणासाठी वाण म्हणून देऊ शकता, हा चांगला पर्याय आहे.
-
मॉयश्चरायझर – सध्या हिवाळ्याचे दिवस सुरू असल्यामुळे तुम्ही सुवासिनींना मॉयश्चरायझरचं छोटसं पॅकेटही वाण म्हणून देऊ शकता.
-
कॅलेंडर – नवीन वर्ष सुरू झाल्याने हळदीकुंकवाच्या वाणासाठी वाण म्हणून तुम्ही कॅलेंडरही देऊ शकता.
-
हातरूमाल (hanky) – हातरुमाल प्रत्येकजण वापरत असतो. म्हणून यंदाच्या हळदीकुंकवाच्या वाणासाठी तुम्ही हात रूमालही देऊ शकता.
-
घर साफ करायचे हँड डस्टर- घरातील साफसफाई करताना हँडग्लव्हज डस्टरचा वापर केला जातो. वाण म्हणून तुम्ही हे हँडग्लव्हज डस्टर सुवासिनींना देऊ शकता.
-
कानातले: महिला सुंदर दिसण्यासाठी विविध आपली सुंदरता वाढवण्यासोबतच आपल्या श्रृगांवरही लक्ष देतात ज्यामुळे त्या आकर्षक दिसतात. यापैकी एकच म्हणजे कानातले. तुम्ही हळदीकुंकवासाठी वाण म्हणून कानातलेही देऊ शकता.
-
टिश्यू पेपर – घरामध्येही रोजच्या वापरात टिश्यू पेपर अत्यंत फायदेशीर ठरतात. त्यामुळे तुम्ही हळदीकुंकवासाठी वाण म्हणून टिश्यू पेपर देऊ शकता. (फोटो सौजन्य-freepik)
मराठी बोलण्यास नकार दिल्यामुळं बेळगावमध्ये वाहकाला मारहाण; महाराष्ट्र-कर्नाटक बस सेवा बंद