-
How Much Sex Do We Need: अनेकदा सेक्स हा विषय आवड, इच्छा, पर्याय, गरज यापलीकडे कर्तव्य म्हणून पाहिला जातो. अशावेळी स्त्री व पुरुषांना किती सेक्स गरजेचा असतो हे जाणून घेण्यासाठी आम्ही सेक्सॉलॉजिस्ट डॉ. राजन भोसले यांच्याशी संवाद साधला.
-
वयाच्या टप्प्यानुसार सेक्स किती करावा यावर डॉ. भोसले म्हणतात विशेषतः वयस्कर महिला ज्या मेनोपॉजच्या टप्प्यावर आहेत त्यांनी आता संन्यास घ्यावा असा एक समज असतो. पण अशाही महिला आहेत ज्यांना मेनोपॉज नंतर सेक्सची अधिक इच्छा असते
-
तारुण्यात आपल्या जोडीदारासह तितका सहवास लाभलेला नसतो, जबाबदाऱ्यांचं ओझं, दडपण, मनातील भीती, गरोदर होण्याची शक्यता यामुळे सुरुवातीला सेक्स नाकारलेल्या स्त्रियांना चाळिशीनंतर अधिक इच्छा होऊ शकते.
-
तर काही महिलांना चाळिशीपासूनच इच्छा कमी होत असल्याचं जाणवतं, नैसर्गिकरित्या योनी कोरडी होणे हे याचं मुख्य कारण असतं आणि हे ही अगदी नॉर्मल आहे
-
वयाच्या विशीत व तिशीत असणाऱ्या तरुणींनी आपल्या इच्छेनुसार व आपल्या सेक्श्युअल जोडीदाराच्या इच्छेनुसार महिन्यात किती वेळा संबंध ठेवायचे हे ठरवायचे असते, यासाठी मनाचा नियम ऐकावा.
-
खूप सेक्स केल्याने काय नुकसान होतं? किती जास्त म्हणजे खूप जास्त? यावर डॉ. भोसले सांगतात की, किडनी, मेंदू, डोळे सगळं काही तुमच्या वयाच्या प्रत्येक टप्प्यात २४X७ सुरु असतं. ज्याप्रमाणे अवयवांना अधिक वापरल्याने कार्यक्षमता कमी होत नाही तसेच सेक्स हे जनेंद्रियांचे एक कामच आहे.
-
तुम्हाला ज्या क्षणी कामात लक्ष न लागणे, डोक्यात सतत सेक्सचाच विचार येणे आणि परिणामी तुमचं मन विचलित होणे अशी लक्षणे दिसतील तेव्हा ती परिस्थिती Too Much Sex चा प्रभाव आहे.
-
तुम्ही जेव्हा जेवायला बसता तेव्हा तुम्ही किती पोळ्या खायला हव्यात? त्यासाठी तुम्ही कुठली नियमावली तपासून बघता की मनाचं ऐकता? हाच नियम आणि हाच पर्याय तुमच्या सेक्स लाइफला सुद्धा लागू होतो.
-
सेक्सॉलॉजिस्ट डॉ. राजन भोसले सांगतात की, किती व कधी सेक्स यावरील सर्व प्रश्नांचं उत्तर एकच.. तुमचं मन हेच तुमच्या गरजेची नियमावली!
१०० वर्षांनंतर शनी गोचर अन् सूर्यग्रहणाचा दुर्मीळ संयोग, ‘या’ राशीच्या लोकांना मिळणार पैसाच पैसा; करिअर, व्यवसायात चमकेल नशीब