-
मधुमेही रुग्णांनी नियमित रक्तातील साखरेची पातळी तपासणे आणि खाण्यापिण्याची विशेष काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. मधुमेही रुग्णांची रोगप्रतिकारशक्ती खूपच कमी असते, अशा परिस्थितीत त्यांनी सकस आहार घेणे गरजेचे आहे.
-
या रुग्णांनी पुरेशी पोषक तत्वे असलेल्या आणि मधुमेहावरही नियंत्रण ठेवणाऱ्या पदार्थांचा आहारात समावेश करावा.
-
हिवाळ्यात अंड खेळ लोकांना फार आवडते. उकडून किंवा ऑम्लेटच्या स्वरूपात अंडी खाल्ली जातात. अनेक गुणधर्मांनी समृद्ध असलेले अंडे सुपरफूड मानले जाते.
-
मात्र, मधुमेही रुग्ण अंड्याचे सेवन करू शकतात का आणि अंडे रक्तातील साखरेवर नियंत्रण मिळवण्यास मदत करू शकते का, असा प्रश्न पडतो.
-
कानपूरच्या गॅस्ट्रो लिव्हर हॉस्पिटलचे डॉ व्ही के मिश्रा यांनी, मधुमेहाच्या रुग्णांनी अंडी खावी की नाही? अंडी मधुमेही रुग्णांचे कोलेस्ट्रॉल वाढवू शकतात का? याबद्दल मार्गदर्शन केले आहे.
-
अमेरिकन डायबेटिक असोसिएशनच्या मते, अंड हा प्रथिनांचा सर्वोत्तम स्त्रोत आहे, त्यामुळे मधुमेही रुग्ण अंड्याचे सेवन करू शकतात. पण दुसर्या एका अभ्यासात असे म्हटले आहे की, अंडी मधुमेही रुग्णांच्या रक्तातील साखर वाढवतात.
-
या संशोधनानुसार अंड्यांमध्ये असलेले कोलेस्ट्रॉलचे प्रमाण समस्या निर्माण करू शकते. आपल्या शरीरातील ७५% कोलेस्ट्रॉल यकृत तयार करते, तर उर्वरित २५% कोलेस्ट्रॉल आहारातून येते.
-
शास्त्रानुसार अंड्याचे सेवन केल्याने आरोग्याला खूप फायदा होतो. अंड्यांमध्ये असलेले अँटी-ऑक्सिडंट, बायोटिन आणि पोटॅशियम शरीराला निरोगी ठेवण्यासाठी उपयुक्त असते.
-
अंडी मुक्त रॅडिकल्सपासून आपले संरक्षण करते, मेंदूचे कार्य सुधारते आणि दृष्टी सुधारते. अंडी खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.
-
अंडी खाल्ल्याने फुफ्फुस आणि मूत्रपिंडाचे कार्यदेखील सुधारते, तसेच मधुमेही रुग्णांमध्ये इन्सुलिन तयार होण्यास मदत होते.
-
तज्ज्ञांच्या मते, अंड्यांच्या सेवनाने मधुमेहाच्या रुग्णांना खूप फायदा होतो. याच्या सेवनाने रक्तातील साखरेची पातळी सामान्य राहते.
-
अंड्यांमध्ये असलेले प्रोटीन मधुमेहाच्या उपचारात खूप उपयुक्त आहे. मधुमेहाच्या रुग्णांनी कमी कार्बोहायड्रेट असलेल्या पदार्थांसह अंड्यांचे सेवन केल्यास अंड्याचे अधिक फायदे मिळू शकतात.
-
तज्ज्ञांच्या मते, एखाद्या व्यक्तीने दररोज ३००mg कोलेस्ट्रॉलचे सेवन केले पाहिजे. मात्र एका अंड्यातून आपल्याला फक्त १८६mg कोलेस्ट्रॉल मिळते. जर दिवसातून एक ते दीड अंडे खाल्ले तर आपल्याला दिवसभरात ३००mg कोलेस्ट्रॉल मिळेल.
-
अंड्याचा पांढरा भाग हा प्रथिनांचा उत्तम स्रोत असल्याने मधुमेहाचे रुग्ण अंड्याचे सेवन करू शकतात.
-
सर्व फोटो: Freepik
Chhaava Deleted Scene : ‘छावा’ चित्रपटातील डिलीट केलेला सीन व्हायरल, जबरदस्त संवाद ऐकून अंगावर येईल काटा