-
सामुद्रिक शास्त्रामध्ये, एखाद्या व्यक्तीच्या अवयवांचा आकार आणि पोत यांच्यामदतीने संबंधित व्यक्तीच्या भविष्याबद्दल आणि स्वभावाबद्दल जाणून घेता येते. सामुद्रिक शास्त्रामध्ये व्यक्तीच्या शरीरावर असलेल्या तिळांचेही तपशीलवार वर्णन केले आहे.
-
म्हणजेच शरीरावर तीळ कुठे आहे आणि त्याचा आकार काय आहे, ते पाहून व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तिमत्त्वाविषयी अंदाज लावले जातात. आज आपण सामुद्रिक शास्त्राच्या मदतीने ओठाच्या आजूबाजूला असलेल्या तिळाबद्दल जाणून घेणार आहोत.
-
खरं तर, कोणत्याही व्यक्तीच्या ओठांवर किंवा त्याच्या आजूबाजूला तीळ असेल तर ते लोकांचे लक्ष खूप लवकर आकर्षित करते.
-
सामुद्रिक शास्त्रानुसार, जर एखाद्या व्यक्तीच्या ओठाखाली तीळ असेल तर ती व्यक्ती आपल्या कामात निपुण असते, म्हणूनच असे लोक आपल्या कार्यक्षेत्रातील लोकांमध्ये लोकप्रिय असतात.
-
त्याचबरोबर, हे लोक धैर्यवान, हुशार, मेहनती आणि प्रामाणिक मानले जातात. या लोकांना प्रवासाची आवड असते. तसेच, त्यांची इच्छाशक्ती प्रबळ असते.
-
जर एखाद्या व्यक्तीच्या ओठांच्या उजव्या बाजूला तीळ असेल तर अशा व्यक्तीचे आपल्या जोडीदारावर खूप प्रेम असते. तसेच या दोघांमध्ये चांगले सामंजस्य असते. तसेच, अशी व्यक्ती आपल्या साथीदाराचे मत लक्षात घेऊनच निर्णय घेते.
-
हे लोक नशिबापेक्षा मेहनतीवर जास्त विश्वास ठेवतात. तसेच, अशा लोकांना चांगले कपडे घालणे आणि चांगले अन्न खाणे आवडते. हे लोक व्यावहारिक आणि दूरदर्शी देखील असतात. ते कामाच्या ठिकाणी सगळ्यांबरोबर मिळून-मिसळून राहतात. पण हे लोक चुकीचे वागणे सहन करू शकत नाहीत.
-
सामुद्रिक शास्त्रानुसार ज्या लोकांच्या खालच्या ओठाच्या मध्यभागी तीळ असतो, असे लोक भावनिक असतात. जर कोणी त्यांच्याशी मोठ्या आवाजात बोलले तर ते दुखी होतात. त्याच वेळी, ते एखाद्या गोष्टीचा तासनतास विचार करतात.
-
असे लोक मल्टीटास्कर असतात. तसेच ते सामाजिकही असतात. त्यांच्या लव्ह लाईफबद्दल बोलायचे झाले तर ते खूप रोमँटिक असतात.
-
येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. (Photos: Pexels/Freepik)
Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”