-
मुळा ही भाजी हिवाळ्यात मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असते. ही भाजी आपण चपाती, भाकरी यांच्याबरोबर किंवा कोशिंबीरमध्ये वापरुन खातो. मुळ्यामध्ये अँटिऑक्सिडंट्स, कॅल्शियम आणि पोटॅशियम सारखी खनिजे असतात.
-
अनेक औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेल्या मुळ्याचे सेवन करणे उच्च रक्तदाब आणि मधुमेह यांसारख्या अनेक जुनाट आजारांविरुद्ध लढण्यासाठी फायदेशीर आहे. तसेच, याचे सेवन केल्याने हृदयविकारांपासून बचाव होतो.
-
मुळा हा नैसर्गिक नायट्रेट्सचादेखील एक चांगला स्रोत आहे. यामुळे रक्ताभिसरण सुधारते. निरोगी आरोग्यासाठी मुळ्याचे सेवन जितके फायदेशीर आहे, तितकेच त्याची पानेही आरोग्यासाठी फायदेशीर आहेत.
-
औषधी गुणधर्मांनी समृद्ध मुळ्याच्या पानांमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी तसेच क्लोरीन, फॉस्फरस, सोडियम, लोह, मॅग्नेशियम आणि इतर पोषक घटक असतात.
-
एम्सचे माजी सल्लागार आणि साओल हार्ट सेंटरचे संस्थापक आणि संचालक डॉ. बिमल झांजेर यांच्या मते, मुळ्याच्या पानांमध्ये अतिशय कमी म्हणजेच २८ कॅलरीज असतात आणि यामध्ये फायबर जास्त असते.
-
व्हिटॅमिन सी आणि बीटा कॅरोटीनने समृद्ध, मुळ्याची पाने शरीराची दिवसभराची गरज पूर्ण करतात. आज आपण तज्ज्ञांकडून जाणून घेऊया मुळाची पाने खाल्ल्याने आरोग्याला कोणते फायदे होतात.
-
मुळ्याची पाने खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते. व्हिटॅमिन सीने समृद्ध मुळ्याची पाने खाल्ल्याने अनेक आजार दूर होतात. याचे सेवन केल्याने सर्दी, विषाणूजन्य ताप यांसारख्या मौसमी आजारांपासून बचाव होतो.
-
मुळ्याच्या पानांमध्ये कॅलरीज खूप कमी असतात, यामुळेच यांच्या सेवनाने वजन सहज आणि लवकर नियंत्रित करता येते. मुळ्याची पाने खाल्ल्याने चयापचय क्रिया वाढते आणि वजन झपाट्याने कमी होते.
-
फायबरयुक्त मुळ्याच्या पानांची भाजी करून सेवन केल्यास पचनक्रिया निरोगी राहते. याच्या पानांमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्याने गॅस आणि अपचन यांसारख्या आजारांपासून आराम मिळतो.
-
मधुमेही रुग्णांनी मुळ्याच्या पानांची भाजी करून सेवन करावे. ही भाजी खाल्ल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहते. व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी 1, व्हिटॅमिन बी 6, फॉस्फरस आणि पोटॅशियमने भरपूर मुळ्याची पाने मधुमेह नियंत्रित करण्यासाठी प्रभावी आहेत.
-
हेल्थलाइनच्या बातमीनुसार डोळे किंवा नजर कमजोर असल्यास मुळ्याच्या पानांची भाजी खावी. व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन सी भरपूर मुळ्याची पाने दृष्टी वाढवतात आणि डोळे निरोगी ठेवतात. (Photos: Pixabay/Freepik)

Chhaava Deleted Scene : ‘छावा’ चित्रपटातील डिलीट केलेला सीन व्हायरल, जबरदस्त संवाद ऐकून अंगावर येईल काटा