-
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, कोणताही ग्रह ज्यावेळेस राशी किंवा नक्षत्र परिवर्तन करतो तेव्हा त्याचा प्रभाव मानवी जीवनावर होत असतो.
-
ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका विशिष्ट वेळेच्या अंतराने राशी बदलतो. ज्याचा परिणाम मानवी जीवनावर आणि पृथ्वीवर होतो. यासोबतच ग्रहाचा राशी बदल काहींसाठी शुभ तर काहींसाठी अशुभ असतो.
-
शुक्र हा धन, ऐश्वर्य, सुख, दागिने, भौतिक सुखांचा कारक मानला जातो. वैभव आणि ऐश्वर्य देणारा शुक्र कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. ज्याचा प्रभाव सर्व राशींवर दिसून येईल.
-
२२ जानेवारीला म्हणजेच आज रविवारी धन व वैभवदाता शुक्र ग्रह दुपारी ०४.०३ वाजता, कुंभ राशीत प्रवेश करेल. शनिदेव आधीच कुंभ राशीत विराजमान आहेत. शनी आणि शुक्र यांच्यात मैत्रीची भावना आहे.
-
हे शुक्र गोचर काही राशींसाठी अत्यंत शुभ व लाभदायक ठरू शकते. यामुळे काही राशींच्या भाग्यात प्रचंड धनलाभ व श्रीमंतीचा योग तयार होत आहे.
-
कुंभ राशीतील शुक्राचे संक्रमण काही राशीच्या लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणेल. या लोकांच्या संपत्तीत, नोकरीत, करिअरमध्ये, व्यवसायात वाढ होण्याची शक्यता आहे. जाणून घ्या कोणत्या राशींच्या लोकांचे भाग्य उजळणार आहे.
-
ज्योतिष शास्त्रानुसार कुंभ राशीतील शुक्राचे संक्रमण मेष राशीच्या लोकांच्या जीवनात मोठे बदल घडवून आणू शकते. नोकरीतही लाभ होण्याची शक्यता आहे. या काळात आर्थिक बाजू मजबूत राहू शकते. व्यक्तीच्या वैवाहिक जीवनात आनंद राहील. कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवू शकाल. गुंतवणुकीचा विचार करत असाल तर हा काळ अनुकूल आहे.
-
शुक्र ग्रहाचे राशी परिवर्तन हे मिथुन राशीसाठी लाभदायक ठरू शकते. शुक्र आपल्या राशीच्या नवव्या स्थानी गोचर करणार आहे. हे स्थान भाग्य व परदेश वारीशी संबंधित आहे. यामुळे ज्यांना परदेशवारीची इच्छा आहे त्यांना लवकरच संधी मिळू शकते. आपल्या इच्छा पूर्ण करणारा हा लाभदायक काळ असू शकतो. आपल्याला वाडवडिलांकडून प्रचंड धनलाभ होऊ शकतो.
-
कुंभ राशीतील शुक्राचे संक्रमण कर्क राशीच्या लोकांच्या जीवनात शुभ परिणाम देऊ शकते. व्यवसायात लाभ होण्याची शक्यता निर्माण होत आहे. त्याच वेळी, कामाच्या ठिकाणी तुम्ही केलेल्या कामाचे कौतुक होऊ शकते. जोडीदारासोबत वेळ घालवण्यासाठी वेळ मिळेल. नोकरदारांसाठीही हा काळ शुभ असू शकतो.
-
शुक्राचे संक्रमण तुमच्यासाठी आर्थिकदृष्ट्या चांगले सिद्ध होऊ शकते. कारण शुक्र ग्रह तुमच्या राशीतून चौथ्या भावात प्रवेश करणार आहे. जे भौतिक सुख आणि मातेचे स्थान मानले जाते. म्हणूनच यावेळी तुम्हाला सर्व भौतिक सुखे मिळू शकतात. तसेच, या काळात तुम्ही वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता.
-
(टीप: वरील लेख हा गृहीतके व प्राप्त माहितीवर आधारित आहे)
‘लाखात एक आमचा दादा’ फेम मराठी अभिनेते संतोष नलावडे यांचे अपघाती निधन