-
मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी, आपल्याला रक्तातील साखरेची पातळी, औषधे, व्यायाम आणि खाण्याच्या सवयींचे नियमित निरीक्षण करणे आवश्यक आहे. याशिवाय, दिवसभर आपल्या मधुमेहाच्या स्थितीबद्दल जागरुक असणे महत्वाचे आहे.
-
आपला दैनंदिन आहार कसा असावा यापासून ते आपला व्यायाम, इतकेच नाही तर झोपायला येईपर्यंत आपण काय करतो याबाबत काळजी घेणे आवश्यक आहे.
-
रात्री झोपण्यापूर्वी आपली ठराविक दिनचर्या पाळल्यास आपल्याला मधुमेहाचे नीट व्यवस्थापन करण्यास मदत मिळू शकते. त्याचबरोबर दररोज चांगली झोप घेण्यासही मदत होईल.
-
मधुमेहासाठी निरोगी आहार आणि जीवनशैली खूप महत्त्वाची आहे. म्हणून, लक्षणांची तीव्रता कमी करण्यासाठी आपल्या दिनचर्येत निरोगी सवयींचा समावेश करणे आवश्यक आहे.
-
आज आपण झोपण्यापूर्वी करायच्या काही गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यामुळे आपल्याला रक्तातील साखरेच्या पातळीचे अधिक चांगल्या प्रकारे व्यवस्थापन करता येऊ शकते.
-
१. बेडटाइम स्नॅक्स: संप्रेरक स्राव सकाळी लवकर होतो ज्यामुळे इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता वाढते. झोपण्यापूर्वी कार्बोहायड्रेट्सचे सेवन किंवा रात्रभर शरीरात ग्लुकोजचे जास्त उत्पादन यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते.
-
सकाळची ही घटना टाळण्यासाठी, झोपण्यापूर्वी भूक लागत असल्यास उच्च फायबर, कमी चरबीयुक्त स्नॅक घ्या. साधे किंवा हळद घातलेल्या दुधासह बदाम, अक्रोडाचे तुकडे किंवा एक सफरचंद हे आरोग्यदायी पर्याय आहेत.
-
२. झोपण्यापूर्वी चाला: तुम्ही कोणत्याही प्रकारची शारीरिक हालचाल करता तेव्हा शरीर ही कार्ये पार पाडण्यासाठी ग्लुकोजचा वापर करते. रक्तातील साखरेची पातळी सहसा जेवणानंतर वाढते.
-
अभ्यासानुसार, झोपण्यापूर्वी चालल्याने रक्तातील साखरेची पातळी सामान्य ठेवण्यासाठी मदत होते. शारीरिकदृष्ट्या सक्रिय असल्याने शरीर इन्सुलिनसाठी अधिक संवेदनशील बनते. इन्सुलिन शरीराला उर्जेचा पुरवठा करण्यासाठी रक्तातील ग्लुकोज वापरण्याचे संकेत देतो.
-
३. पायाची संवेदनशीलता तपासत राहा: दीर्घकालीन मधुमेहामुळे मज्जातंतूंचे नुकसान होते आणि त्यामुळे पायांची संवेदनशीलता नष्ट होऊ शकते. यामुळे पायावर कोणतेही ओरखडे किंवा फोड आलेले लगेच समजत नाही. यामुळे गंभीर संसर्ग होऊ शकतो.
-
याशिवाय, खराब रक्ताभिसरण आणि रक्तातील साखरेची वाढलेली पातळी आपल्या शरीराला संक्रमणापासून लढण्यास अडथळे निर्माण करू शकतात. तथापि, नियमितपणे पायांची देखभाल केल्यास आपण संसर्गाचा धोका लक्षणीयरीत्या कमी करू शकतो.
-
४. मानसिक आरोग्याची काळजी घ्या: जेव्हा आपण तणावाखाली असतो तेव्हा कॉर्टिसॉल आणि अॅड्रेनालाईनसारखे स्ट्रेस हार्मोन्स बाहेर पडतात. या संप्रेरकांमुळे इन्सुलिनला प्रभावीपणे कार्य करणे कठीण होते. यामुळे, पेशी शरीरातून ऊर्जा घेण्यास अपयशी ठरतात आणि रक्तातील साखरेची पातळी वाढते.
-
५. दात घासणे आणि फ्लॉस करणे: मधुमेहाच्या रुग्णांनी त्यांच्या हिरड्या आणि दातांची विशेष काळजी घ्यावी. टाइप २ मधुमेह असलेल्या लोकांना हिरड्यांचे आजार आणि दातांमध्ये कीड निर्माण होण्याची शक्यता असते.
-
जर तुम्हाला टाइप २ मधुमेहाचा त्रास असेल तर तुमची लाळ सामान्यपेक्षा गोड असते. यामुळे मधुमेह हा हिरड्यांच्या आजारचे कारण बनते आणि यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते.
-
यामुळे डायबिटीजवर नियंत्रण मिळवण्याच्या समस्येत आणखी भर पडते. हे बॅक्टेरिया साखरेवर वाढतात. म्हणूनच दररोज रात्री झोपण्यापूर्वी योग्य प्रकारे ब्रश आणि फ्लॉस करणे आवश्यक आहे. (Photos: Freepik)
“…तर माझेही तुकडे केले असते”, नाना पाटेकरांनी वाचवला होता अशोक सराफांचा जीव; म्हणाले, “नान्या रिक्षा घेऊन…”