-
सध्या प्रत्येकाचा कल निरोगी आहारापेक्षा चटपटीत आणि लवकर तयार होणारे जंकफूड खाणींकडे असतो. तुम्हीही जंकफूडचे चाहते असाल तर तुम्ही वेळीच सावध होणे गरजेचे आहे.
-
एक अभ्यासातून समोर आलेल्या माहितीनुसार काही प्रकारच्या जंकफूडच्या सेवनाने हृदयविकार आणि कर्करोग यासारखे गांभिराजर होण्याचा धोका अनेक पटींनी वाढत आहे.
-
युनायटेड किंगडममधील १९७,००० हून अधिक लोकांवर केलेल्या अभ्यासानुसार, अतिप्रक्रिया केलेले अन्न किंवा जंक फूडचे सेवन केल्याने कर्करोगासारख्या प्राणघातक आजारांचा धोका वाढू शकतो.
-
या अभ्यासानुसार संशोधकांच्या असे निदर्शनास आहे की जे तरुण जंकफूडचे मोठ्या प्रमाणावर सेवन करतात त्यांना कर्करोग होण्याचा धोका सर्वाधिक असतो. अशा लोकांसाठी कर्करोगाचा कौटुंबिक इतिहास गरजेचा नसतो.
-
संशोधकांच्या मते, या अभ्यासात अर्ध्याहून अधिक महिलांना गर्भाशयाचा कर्करोग होता. जर तुम्ही पिझ्झा, बर्गर, चिप्स आणि चाउमीन यांसारखे जंक फूडचे अधिक सेवन करत असाल तर तुम्हीही सतर्क राहायला हवे.
-
या पदार्थांमुळे मधुमेह आणि लठ्ठपणा तर वाढतोच पण कर्करोगचा धोकाही वाढतो. हे पदार्थ कर्करोगासाठी कारणीभूत कसे ठरतात ते जाणून घेऊया.
-
ईक्लिनिकल मेडिसीन या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, अल्ट्रा-प्रोसेस्ड फूड खाल्ल्याने ३४ वेगवेगळ्या प्रकारच्या कर्करोगामध्ये संबंध दिसून आला. या अभ्यासासाठी संशोधकांनी १९७,४२६ लोकांच्या खाण्याच्या सवयींची माहिती तपासली.
-
इम्पीरियल कॉलेज लंडनने जारी केलेल्या अहवालानुसार, अल्ट्रा प्रोसेस्ड फूड खाल्ल्याने कोणत्याही प्रकारच्या कर्करोगाचा धोका दोन टक्क्यांनी वाढतो. अल्ट्रा प्रोसेस्ड फूडच्या अतिसेवनामुळे गर्भाशयाच्या कर्करोगाचा धोका वाढतो.
-
अभ्यासानुसार, जे लोक या जंक फूडचे जास्त सेवन करतात त्यांना गर्भाशयाच्या कर्करोगाचा धोका ३०% जास्त असतो. संशोधकांच्या मते, प्रक्रिया केलेले अन्न खाल्ल्याने कोणत्याही कर्करोगाचा धोका २% आणि गर्भाशयाच्या कर्करोगाचा धोका १९% वाढू शकतो.
-
उच्च प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थांमध्ये फ्रेंच फ्राईज, सोडा, स्टोअरमधून विकत घेतलेल्या कुकीज, केक, कँडी, डोनट्स, आइस्क्रीम, सॉसेज, हॉट डॉग्स, प्री-पॅकेज केलेले सूप्स, फ्रोझन पिझ्झा, खाण्यासाठी तयार जेवण यांसारख्या लोकप्रिय फास्ट-फूडचा समावेश होतो.
-
इम्पीरियल येथील नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ अँड केअर रिसर्च फेलो, लेखिका डॉ कियारा चँग यांनी सांगितले की, हे पदार्थ दीर्घकाळासाठी साठवून ठेवण्यासाठी आणि यांची चव वाढवण्यासाठी यामध्ये रंग, चव, सुसंगतता आणि पोत वाढवणाऱ्या पदार्थांचा वापर केला जातो जे आरोग्यासाठी हानिकारक असतात आणि त्यांच्या सेवनाने अनेक प्रकारच्या कर्करोगाचा धोका वाढतो.
-
सर्व फोटो : Freepik
५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ