-
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह वेळोवेळी राशी बदलतात, ज्याचा परिणाम मानवी जीवनावर, देशावर आणि संपूर्ण जगावर दिसून येतो.
-
तसंच संक्रमण करणारे ग्रह इतर ग्रहांशी युती करतात. एप्रिलच्या सुरुवातीला गुरु आणि सूर्याची युती होणार आहे.
-
बारा वर्षांनंतर मेष राशीत ही युती तयार होणार आहे, कारण गुरू बारा वर्षांनी मेष राशीत प्रवेश करत आहे.
-
सूर्यदेव हा ग्रहांचा राजा आहे. पृथ्वीवरील उर्जेचे महान स्त्रोत असेही सूर्याला म्हटले जाते. तर गुरु हा ज्ञान, विकास आणि भाग्याचा ग्रह मानला जातो.
-
आता तब्बल बारा वर्षांनंतर एकाच राशीत सूर्य आणि गुरूचा संयोग होणार असल्याने या युतीचा प्रभाव सर्व राशींच्या लोकांवर दिसून येईल.
-
जेव्हा सूर्य आणि गुरु भेटतात तेव्हा काही राशींच्या लोकांसाठी हे फार शुभ ठरते. त्यांचे भाग्य खुलते. या युतीमुळे त्यांना धन आणि प्रगतीचे लाभ मिळण्याची शक्यता आहे.
-
सूर्य आणि गुरूचा संयोग तीन राशींसाठी फायदेशीर ठरू शकतो. गुरु आणि सूर्यदेवाच्या कृपेने त्यांना बक्कळ धनलाभ होण्याची शक्यता आहे. चला तर जाणून घेऊया कोणत्या आहेत, या भाग्यशाली राशी..
-
सूर्य आणि गुरूचा संयोग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो, कारण ही युती तुमच्या राशीतून चतुर्थ स्थानात होणार आहे. जे भौतिक सुख आणि मातेचे स्थान मानले जाते. म्हणूनच यावेळी तुमच्या सुख-सुविधांमध्ये वाढ होऊ शकते. तसेच,यावेळी तुम्ही वाहन किंवा मालमत्ता खरेदी करण्याचा निर्णय घेऊ शकता.यासोबतच या संयोगाची दृष्टी तुमच्या पारगमन कुंडलीच्या दहाव्या भावावर पडत आहे. त्यामुळे तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते.तसेच व्यावसायिकांना नफा मिळू शकतो.
-
सिंह राशीच्या लोकांसाठी सूर्य आणि गुरूची युती शुभ ठरू शकते, कारण ही युती तुमच्या संक्रमण कुंडलीच्या नवव्या घरात होणार आहे. जे भाग्य आणि परदेशी स्थान मानले जाते. म्हणूनच यावेळी तुम्ही भाग्यवान होऊ शकता. तसेच ज्या लोकांना परदेशात जाण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी हा काळ शुभ ठरु शकतो. त्याच वेळी, याकाळात तुमचे वडिलांसोबतचे नाते घट्ट होईल. तसेच याकाळात तुम्ही धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. दुसरीकडे, सिंह राशीवर सूर्य देवाचे राज्य आहे. त्यामुळे ही युती आपल्यासाठी फायदेशीरठरू शकते.
-
धनु राशींच्या लोकांसाठी सूर्य आणि गुरूचा संयोग लाभदायक ठरू शकतो, कारण ही युती तुमच्या संक्रमण कुंडलीच्या पाचव्या घरात तयार होईल. ज्याला मूल आणि प्रेमविवाहाचे स्थान मानले जाते. म्हणूनच यावेळी तुम्हाला प्रेमविवाहात यश मिळू शकते. यासोबतच नवविवाहित जोडप्याला अपत्यप्राप्ती होऊ शकते. दुसरीकडे, तुम्ही कुटुंबातील सदस्यांसह किंवा लव्ह पार्टनरसोबत कुठेतरी डिनर डेटवर जाऊ शकता. या काळात तुमची आर्थिक स्थितीही चांगली राहू शकते.
-
(टीप: वरील लेख हा गृहीतके व प्राप्त माहितीवर आधारित आहे)
६ फेब्रुवारी राशिभविष्य: सूर्याच्या नक्षत्र परिवर्तनाने मेष, सिंहच्या कुंडलीत होणार मोठे बदल; पंचांगानुसार तुमच्या राशीचे भाग्य कसे उजळणार?