-
असे म्हटले जाते की मधुमेह्यांच्या रुग्णांनी खजूर खाऊ नयेत. मात्र नुकत्याच करण्यात आलेल्या अध्यायनात असे दिसून आले आहे की खजूर खाल्ल्याने रक्तातील ग्लुकोज, कोलेस्टेरॉल, शरीराचे वजन किंवा रक्तदाब यावर विशेष परिणाम होत नाही. परंतु त्यांचे सेवन योग्य प्रमाणात केले पाहिजे.
-
काही अभ्यासात असेही म्हटले आहे की जर तुम्ही योग्य प्रमाणात खजूर खाल्ले तर ते तुमच्या रक्तातील साखर वाढण्यापासून रोखू शकतात.
-
फोर्टिस सीडीओसी हॉस्पिटल फॉर डायबिटीज अँड अलाईड सायन्सेसचे अध्यक्ष डॉ. अनूप मिश्रा आणि तमिळनाडू सरकारी मल्टी-सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या आहारतज्ज्ञ डॉ. मीनाक्षी बजाज यांच्या अभ्यासातून ही माहिती समोर आली आहे.
-
रक्तातील साखर, ग्लायकोसिलेटेड हिमोग्लोबिन, लिपिड प्रोफाइल आणि शरीराचे वजन यावर खजुराच्या सेवनाचा परिणाम शोधण्याचा प्रयत्न या अभ्यासात करण्यात आला.
-
जानेवारी २००९ ते नोव्हेंबर २०२२ दरम्यान इस्रायल, सौदी अरेबिया आणि इतर देशांमधील विविध डाटाबेसचा अभ्यास करून याबाबत माहिती गोळा करण्यात आली होती.
-
मधुमेहाच्या रुग्णांसाठी १७ प्रकारांपैकी कोणती खजूर फायदेशीर आहे हे माहीत नसताना खजूर खाणे हानिकारक ठरू शकते. खजूर प्रकारांचा ग्लायसेमिक इंडेक्स ४२.८ ते ७४.६ पर्यंत असतो आणि ग्लायसेमिक लोड ८.५-२४ पर्यंत असतो.
-
खजूरचे चार वेगळे टप्पे आहेत – किमरी, खलाल आणि सर्वात सामान्यपणे वापरलेले आणि अभ्यासले जाणारे रुताब आणि टेमर आहेत. खजूरच्या वेगवेगळ्या टप्प्यांचा जीआय देखील वेगवेगळा असतो.
-
उदाहरणार्थ: रुताब (अर्ध-पिकलेले) ४७.२, टेमर (पूर्णपणे पिकलेले, पारंपारिकपणे उन्हात वाळलेले) ४५.३ आणि टेमर (व्यावसायिक) ३५.५. टेमर हे पिकलेले खजूर आहे, जे वाळवून कडक आणि गडद रंगाची केली जातात.
-
सौदी अरेबियातील खजूरमध्ये साखर, ग्लायसेमिक इंडेक्स आणि ग्लायसेमिक लोड सर्वात कमी असतो. डॉ. बजाज म्हणतात, “भारतात सामान्यतः आढळणाऱ्या खजूरांमध्ये मध्यम ग्लायसेमिक लोड असतो.”
-
“टेमर खजूर आजकाल भारतीय बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. खजुराच्या काही जातींमध्ये प्रथिने आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे पोट भरते आणि साखरेचे सेवनही मर्यादित होते.”
-
डॉ बजाज स्पष्ट करतात, “मधुमेहींनी खजूर खाणं कमी केलं पाहिजे. जय अभ्यासांच्या समिक्षांमध्ये अर्धवट पिकलेले रुताब आणि पिकावून वाळवलेल्या टेमर यांच्यावरील अभ्यासाचे विश्लेषण केले आहे. या दोन्ही प्रकारचे खजूर अरबमध्ये अतिशय सहजपणे ओळखले जातात. मात्र इतरांना ते ओळखणे सोपे नसते.”
-
सौदी अरेबियामध्ये २०२२ मध्ये एक अभ्यास करण्यात आला. रुताब आणि टेमर यांचे वर्षभर केलेल्या सेवनाच्या परिणामांचे मूल्यांकन या अभ्यासात करण्यात आले होते. या अभ्यासातून असे निदर्शनास आले की यांच्या सेवनाने रक्तातील साखर आणि एचबीए1सीच्या स्तरात सुधार झाला.
-
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन (NIN) नुसार, १०० ग्रॅम खजूर ३११ कॅलरीज, ९ ग्रॅम फायबर, १ ते ३ ग्रॅम प्रथिने आणि सेलेनियम, मॅग्नेशियम, तांबे, पोटॅशियम, कॅल्शियम फॉस्फेट आणि मॅंगनीज यांसारख्या सूक्ष्म पोषक घटकांनी समृद्ध असतात.
-
डॉ बजाज म्हणतात, “२०१८ मधील एका शोधनिबंधात असे आढळून आले आहे की वाळलेले गडद तपकिरी खजूर एनिमियासाठी चांगले असू शकतात. त्या प्रकारच्या खजुराच्या प्रति १०० ग्रॅममध्ये ४.७० मिलीग्राम लोह आढळते.”
-
“अलीकडील आकडेवारीवरून असे लक्षात आले की दैनंदिन सेवन केले जाणारे टेमर प्रकारचे खजूर, २१ दिवस ते सहा महिन्यांत एलडीएल कोलेस्ट्रॉल कमी करू शकतात. मात्र हे केवळ गैर-मधुमेहाच्या रुग्णांना लागू होते.” (Photos: Freepik)

Video: चांगल्या कर्माचे फळ चांगलेच! काळ आला होता; पण…! गटाराचे उघडे झाकण लावायला गेला अन् चमत्कार झाला, दोन सेकंदांतच…