-
मधुमेह हा मेटबॉलिक आजार आहे, जो रुग्णाला आतून कमकुवत करतो. या आजाराच्या विळख्यात आलेल्या व्यक्तीच्या शरीरात अनेक लक्षणे दिसू लागतात आणि ती व्यक्ती अशक्त होऊ लागते.
-
जास्त भूक लागणे, सतत लघवीला होणे, अंधुक दृष्टी, जखम लवकर बरी न होणे आणि सतत थकवा जाणवणे ही रक्तातील साखर वाढल्याची लक्षणे आहेत.
-
मधुमेही रुग्णाला रक्तातील साखरेचे वाढलेले प्रमाण कमी करण्यासाठी आपल्या आहारकडे नीट लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच जेवणासाठी आपण कोणते तेल वापरत आहोत हेही माहीत असणे गरजेचे आहे.
-
जेवणासाठी वापरले जाणारे तेल केवळ रक्तातील साखर वाढवण्यासाठी कारणीभूत ठरत नाही, तर यामुळे वजन वाढण्याची आणि वेगवेगळे आजार होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.
-
मधुमेहाच्या रुग्णाला हृदयविकाराचा धोका जास्त असतो. म्हणूनच खाद्यतेलाचे सेवन विचारपूर्वक करणे महत्त्वाचे आहे.
-
डालडा आणि पामतेल असे वनस्पती तेल आरोग्यासाठी घातक ठरू शकतात. या तेलांचे सेवन केल्याने कोलेस्ट्रॉल वाढतो आणि मधुमेहाच्या रुग्णाची समस्या वाढू लागते.
-
अपोलो हॉस्पिटल ग्रेटर नोएडा येथील मधुमेह आणि थायरॉईड विशेषज्ञ डॉ. बी.के. राय यांच्या मते मधुमेहाच्या रुग्णांनी खाद्य तेलाचे सेवन करण्यापूर्वी नीट विचार करावा. आज आपण मधुमेहाच्या रुग्णांनी कोणत्या खाद्य तेलाचे सेवन करणे फायदेशीर ठरू शकते आणि कोणते तेल अपायकारक ठरेल, हे जाणून घेऊया.
-
अमेरिकी डायबिटीज असोसिएशननुसार मधुमेहाच्या रुग्णांनी ट्रान्स फॅट आणि सॅच्युरेटेड फॅटच्या तुलनेत मोनोअनसॅच्युरेटेड आणि पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटचे सेवन करावे.
-
मधुमेहाच्या रुग्णांनी पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड (पुफा) अधिक असणाऱ्या स्वयंपाकाच्या तेलाचे सेवन टाळावे. हे आरोग्यासाठी हानिकारक तेल आहे. सोया तेल, कॉर्न ऑइल, सूर्यफूल तेल आणि कापूस बियांचे तेल यांचे सेवन टाळावे.
-
हे तेल चांगले कोलेस्ट्रॉल शरीराच्या बाहेर टाकते. या तेलांमध्ये पुफाची मात्रा जास्त असते. म्हणूनच मधुमेहाच्या रुग्णांनी या तेलापासून अंतार राखणे गरजेचे आहे. त्यांनी चुकूनही रिफाइंड ऑयलचे सेवन करू नये.
-
मधुमेहाच्या रुग्णांनी रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी आणि हृदयविकारांपासून बचाव करण्यासाठी ऑलिव्ह ऑईल, तिळाचे तेल, तांदळाचे तेल, शेंगदाणा तेल आणि खोबरेल तेलाचे सेवन करावे.
-
हे तेल नैसर्गिकरित्या चरबी बर्न करतात आणि भूक नियंत्रित करतात. तांदळाच्या तेलात मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे मधुमेहाच्या रुग्णांसाठी उत्तम आहे.
-
तिळाचे तेल व्हिटॅमिन ई आणि इतर अँटिऑक्सिडंट गुणधर्मांनी समृद्ध आहे जे हृदय तसेच त्वचा आणि केसांची काळजी घेते. ऑलिव्ह ऑईल इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता सुधारण्यास मदत करते. यातील दाहक-विरोधी गुणधर्म शरीराची सूज दूर करतात. मधुमेहाचे रुग्ण या तेलांचे सेवन करू शकतात. (Photos: Freepik)
Video : शेतकऱ्यांसाठी बेस्ट जुगाड! पोती उचलायला मजूर नाही? तर ही भन्नाट युक्ती वापरून पाहा, व्हिडीओ होतोय व्हायरल