-
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह वेळोवेळी राशिचक्र बदलतात ज्याचा परिणाम मानवी जीवनावर आणि पृथ्वीवर दिसून येतो.
-
वैदिक ज्योतिषशास्त्रात, शनि ग्रहाला न्याय देवता आणि दाता म्हणून पाहिले जाते. शनिदेव व्यक्तीला त्याच्या कर्माच्या आधारे चांगले आणि वाईट दोन्ही फळ देतात, असं मानले जाते.
-
३० वर्षानंतर १७ जानेवारीला पहिल्यांदाच शनी देवाने कुंभ राशीत प्रवेश केला आहे आणि १४ फेब्रुवारीपर्यंत ते नवांश कुंडलीमध्ये उच्चस्थानी राहतील.
-
तसेच कुंभ राशीत शनिदेव चंद्राच्या होरामध्ये विराजमान असून ज्योतिषशास्त्रात हे स्थान खूप महत्वाचे आणि शुभ मानले जाते.
-
शनीचे हे स्थान चार राशींसाठी अत्यंत लाभदायक ठरू शकते. त्यांना करिअर आणि व्यवसायामध्ये लाभ होण्याची शक्यता निर्माण होत आहे.
-
येत्या काळात या चार राशींची आर्थिकस्थिती चांगली राहण्याची शक्यता आहे. चला तर जाणून घेऊया कोणत्या आहेत, या भाग्यशाली राशी…
-
नवांश कुंडलीतील शनिदेवाचे उच्च स्थान तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. शनिदेव आपल्या राशीच्या गोचर कुंडलीत कर्माच्या व लाभाच्या ठिकाणी स्थित आहेत. त्यामुळे या वेळी कोणतेही नवीन काम सुरू करायचे असल्यास हा काळ तुमच्यासाठी शुभ ठरु शकतो. यावेळी तुम्हाला अचानक धनलाभ होण्याची शक्यता निर्माण होत असून बेरोजगारांना नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते.
-
नवांश कुंडलीमध्ये शनिदेव उच्च स्थानावर स्थित असल्यामुळे मिथुन राशीतील लोकांसाठी चांगले दिवस लाभू शकतात. शनिदेव मिथुन राशीच्या गोचर कुंडलीत भाग्य स्थानी आहेत आणि नवांश कुंडलीमध्ये पंचम भावात उच्च स्थानावर स्थित आहेत. हे स्थान करिअरच्या दृष्टीने लाभदायक मानले जाते. या काळात तुमचे परदेशात शिक्षण घेण्याचे स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता आहे. धनलाभाचे सुद्धा योग आहेत. तसेच आपल्याला संतती सुखाची प्राप्ती होऊ शकते.
-
नवांश कुंडलीमध्ये शनिदेवाची उच्चस्तिथी धनु राशीच्या लोकांसाठी शुभ आणि फलदायी ठरू शकते. शनिदेवाचे गोचर तुमच्या कुंडलीत धनस्थानी आहे तर गुरु ग्रह तिसऱ्या स्वामित्व स्थानी स्थिर आहे. धनु राशीचे स्वामी गुरु आहेत. गुरु ग्रह सध्या स्वराशीतच विराजमान आहेत. नवांश कुंडलीत शनी व गुरु उच्च स्थानी असल्याने व्यवसायात लाभ होऊ शकतो. त्याचबरोबर १७ जानेवारीपासून शनीची साडेसातीही तुमच्यापासून दूर झाली आहे. त्यामुळे तुम्ही कोणतेही काम सुरू करू शकता. या कामात तुम्हाला यश मिळण्याची शक्यता आहे.
-
नवांश कुंडलीमध्ये शनिदेव उच्च स्थानावर असणे मकर राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते. शनिदेव तुमच्या संक्रमण कुंडलीच्या भाग्यशाली स्थानी विराजमान आहेत. त्यामुळे यावेळी नशीब तुमच्या सोबत असेल. तुम्हाला अचानक धनलाभ होऊ शकतो. त्याचवेळी, नोकरदार लोकांच्या पदोन्नती आणि वेतनवाढीचीही चर्चा होऊ शकते. नवीन नोकरीचा प्रस्ताव मिळू शकतो. एकंदरीत मकर राशीसाठी चांगले योग निर्माण होऊ शकतात.
-
(हे ही वाचा : तब्बल बारा वर्षांनी जुळून येतोय् ‘असा’ योग; गुरु आणि सूर्यदेवाच्या कृपेने ‘या’ राशींना मिळू शकतो प्रचंड पैसाच पैसा )
-
(टीप: वरील लेख हा गृहीतके व प्राप्त माहितीवर आधारित आहे)
US Illegal Immigrants : ‘अमेरिकेत होते हे माहितीच नव्हतं’, ट्रम्प यांनी भारतात परत पाठवलेल्या गुजराती स्थलांतरितांच्या कुटुंबियांचा खुलासा