-
अंडी हे एक असे सुपरफूड आहे जे मांसाहारी लोकांबरोबरच शाकाहारी लोकही मोठ्या प्रमाणावर खातात. प्रथिनेयुक्त अंड्याचे सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते आणि शरीर निरोगी राहते.
-
आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण अंडी जीवनसत्त्वे, खनिजे आणि निरोगी चरबी यांसारख्या पोषक तत्वांनी समृद्ध असतात. मात्र आरोग्यासाठी फायदेशीर मानल्या जाणाऱ्या अंड्यामुळे काही आजारही वाढू शकतात.
-
हृदयविकाराच्या रुग्णांना अंडी न खाण्याचा सल्ला दिला जातो. असे म्हटले जाते की अंडी खाल्ल्याने कोलेस्टेरॉल वाढते आणि हृदयविकाराचा धोकाही जास्त असतो.
-
मात्र, नव्या संशोधनातून समोर आलेल्या माहितीनुसार खाल्ल्याने हृदयाला कोणतेही नुकसान होत नाही. मात्र, आपण त्यांचे किती प्रमाणात सेवन करतो यावरून त्याचे परिणाम लक्षात घेत येऊ शकतात. हृदयरोग्यांसाठी अंडी किती फायदेशीर आहे हे संशोधनात जाणून घेऊया.
-
जर्नल न्यूट्रिएंट्समध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, अधिक अंडी खाल्ल्याने तुमच्या हृदयाचे आरोग्य सुधारू शकते.
-
बोस्टन विद्यापीठातील संशोधकांनी २,३०० हून अधिक प्रौढांच्या डेटाचा अभ्यास केला आणि असा निष्कर्ष काढला की आठवड्यातून पाच किंवा अधिक अंडी खाणे हे उच्च रक्तदाब आणि रक्तातील साखर नियंत्रणाशी संबंधित आहे. अंड्याचे सेवन केल्याने टाइप २ मधुमेहाचा धोका कमी होतो. या संशोधनानुसार, अंडी खाल्ल्याने हृदयाचे आरोग्य सुधारते.
-
सध्या, अमेरिकन हार्ट असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार निरोगी हृदयासाठी आहाराचा भाग म्हणून अंड्याचा पांढरा भाग खाण्याव्यतिरिक्त दररोज एक किंवा दोन संपूर्ण अंड खाणे फायदेशीर आहे.
-
अंड हे प्रथिने आणि इतर पोषक तत्वांचा समृद्ध स्रोत असले तरीही ते कोलेस्टेरॉलची पातळी वाढवण्यासाठी कारणीभूत ठरते. त्यामुळेच मोठ्या प्रमाणावर अंडी खाणे हृदयासाठी हानिकारक ठरू शकते.
-
फोर्टिस एस्कॉर्ट्स हार्ट इन्स्टिट्यूट, ओखला, नवी दिल्ली येथील इलेक्ट्रोफिजियोलॉजी आणि कार्डियाक पेसिंगच्या संचालक डॉ. अपर्णा जसवाल यांनी सांगितले की, एका अंड्यातून सुमारे सहा ग्रॅम प्रथिने मिळतात. जर तुमचे वजन ६० किलो असेल तर तुम्हाला ४०-६० ग्रॅम प्रथिनांची आवश्यकता असते.
-
डॉक्टर जसवाल यांनी indianexpress.com ला सांगितले की, अंड्याचा पांढरा खाण्याव्यतिरिक्त तुम्ही आठवड्यातून दोन ते तीन वेळा अंड्यातील पिवळ बलक देखील खाऊ शकता.
-
पोषणतज्ञ आणि न्यूट्रेसी लाइफस्टाइलच्या संस्थापक डॉ. रोहिणी पाटील यांनी यापूर्वी indianexpress.com ला सांगितले होते की अंड्यांमध्ये इतर पोषक घटक देखील असतात.
-
जसे की, व्हिटॅमिन ए – ६ टक्के, व्हिटॅमिन बी 5 – ७ टक्के, व्हिटॅमिन बी 12 – ९ टक्के, फॉस्फरस – ९ टक्के, व्हिटॅमिन बी 2 – १५ टक्के, सेलेनियम – २२ टक्के
-
डॉ. पाटील यांनी indianexpress.com यांना सांगितले, “हेच कारण आहे की सकाळच्या नाश्त्यात अंडी खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. अंड्यांमध्ये रक्तदाब नियंत्रित करणारे गुणधर्म देखील असतात. (Photos: Freepik)

Kunal Kamra Controversy : “मी जिथे राहत नाही तेथे जाणं म्हणजे…”; कुणाल कामराची सूचक पोस्ट, मुंबई पोलिसांना डिवचलं?