-
बर्फाच्या पाण्याने अंघोळ करण्याची पद्धत अलीकडच्या काळात लोकप्रिय झाली असली तरीही ही पद्धत फार पूर्वीपासूनच वापरली जात आहे. बर्फाच्या पाण्याने अंघोळ करण्याचे अनेक आश्चर्यकारक फायदे आहेत.
-
बर्फाच्या पाण्याने अंघोळ करणे सोपे नाही. मात्र यामुळे होणारे फायदे पाहून तुम्हालाही विश्वास बसणार नाही. आज आपण बर्फाच्या पाण्याने अंघोळ करणे शरीरासाठी कसे फायदेशीर आहे ते जाणून घेऊया.
-
हिवाळ्यात आपण अंघोळीसाठी आवर्जून गरम पाण्याचा वापर करतो. मात्र उन्हाळा आला की लोक थंड पाण्याने अंघोळ करणे पसंत करतात. याचीच एक पायरी पुढे जाऊन बर्फाच्या पाण्याने अंघोळ केल्यास आपल्याला अनेक समस्यांपासून आराम मिळू शकतो.
-
बर्फाच्या पाण्याने अंघोळ केल्यास रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि सामान्य तापमानात आल्यावर त्या पुन्हा प्रसारण पावतात. यामुळे मांसपेशींमधील मेटबॉलिक वेस्टेज कमी होण्यास मदत होते.
-
अनेक अभ्यासातून अशी माहिती समोर आली आहे की बर्फाच्या पाण्याने अंघोळ केल्यास आपले मानसिक स्वास्थ्य सुधारते. थंड पाणी स्ट्रेस रिस्पॉन्सला ट्रिगर करते आणि मज्जासंस्था सक्रिय करते.
-
बर्फाच्या थंड पाण्यामुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. यामुळे स्नायूंना रक्तपुरवठा कमी होतो आणि सूज, जळजळ यासारखा त्रास कमी होण्यास मदत होते.
-
बर्फाच्या पाण्यांने अंघोळ केल्यास आपली रोगप्रतिकरक शक्ती मजबूत होते आणि यामुळे आपल्याला अनेक आजारांपासून लढा द्यायला मदत होते.
-
बर्फाच्या पाण्याने अंघोळ केल्याने आपल्या मध्यवर्ती मज्जासंस्थेवर सकारात्मक परिणाम होतो, यामुळे आपल्याला चांगली झोप लागते.
-
(Photos: Freepik)

Chhaava Deleted Scene : ‘छावा’ चित्रपटातील डिलीट केलेला सीन व्हायरल, जबरदस्त संवाद ऐकून अंगावर येईल काटा