-
वैदिक ज्योतिषशास्त्रात शनिदेवाला न्यायची देवता म्हटले आहे कारण ते व्यक्तीच्या कर्मानुसार त्याला फळ देतात. शनि हा ग्रह सर्वात हळू चालतो आणि अडीच वर्षांनी आपली राशी बदलतो.
-
या वर्षी, १७ जानेवारी २०२३ रोजी, शनिदेवाने तब्बल ३० वर्षांनंतर त्यांच्या मूळ त्रिकोण राशीत कुंभ राशीत प्रवेश केला आहे.
-
आता शनिदेव २९ मार्च २०२५ पर्यंत कुंभ राशीत राहतील. या दरम्यान तीन राशीच्या लोकांना शनिदेवाच्या साडेसातीचा सामना करावा लागू शकतो.
-
या काळात त्यांना अडचणी आणि नुकसानाला सामोरे जावे लागू शकते. म्हणूनच या तीन राशीच्या लोकांना हा दोन वर्षांपेक्षा जास्तचा काळ अतिशय काळजीपूर्वक लागणार आहे.
-
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शनि कुंभ राशीत असल्यामुळे या राशीच्या लोकांसाठी शनिच्या साडेसातीचा दुसरा टप्पा सुरू आहे.
-
शास्त्रात सांगितल्यानुसार, २०२५ पर्यंत साडेसातीदरम्यान या लोकांना कठोर परिश्रम करूनही अपेक्षित फळ मिळण्याची शक्यता कमी आहे.
-
तसेच, नातेसंबंधांवर वाईट परिणाम होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. या कालावधीमध्ये रागावर नियंत्रण ठेवणे चांगले राहील.
-
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, २०२५ पर्यंत मकर राशीच्या लोकांना शनिच्या साडेसातीच्या तिसऱ्या आणि शेवटच्या चरणाला सामोरे जावे लागेल.
-
साडेसतीचा तिसरा टप्पा तुलनेने कमी वेदनादायक असला तरी या लोकांनी व्यवहारात सावधगिरी बाळगावी. तसेच आरोग्याची काळजी घ्यावी.
-
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, २०२५ पर्यंत मीन राशीच्या लोकांसाठी शनिच्या साडेसातीचा पहिला चरण चालू राहील. या काळात मीन राशीच्या लोकांच्या खर्चात वाढ होऊ शकते.
-
दरम्यान, या कालावधीमध्ये या लोकांना परदेशात जाण्याची संधी मिळू शकते. मात्र, आर्थिक समस्याही उद्भवू शकतात. जीवनसाथीसोबतचे नाते बिघडू शकते, म्हणूनच नातेसंबंधांच्या बाबतीत सावध राहा आणि जोडीदाराला वेळ द्या.
-
येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. (File Photos)

Daily Horoscope: हनुमान जयंतीला मारुतीराया कोणाला देणार बळ? राशीनुसार ‘ही’ कामं केल्यास तुमचाही दिवस ठरेल फायद्याचा