-
मासिक पाळी दरम्यान स्त्रियांमध्ये अनेक मानसिक आणि शारीरिक बदल घडून येतात जे स्वाभाविक आहे.
-
प्रत्येक स्त्री समान लक्षणं अनुभवत नाही.
-
वजनात वाढ होणे,मायग्रेन, डोकेदुखी, पोटदुखी, तणाव, वाढती भूक ही मासिक पाळीमधील काही सामान्य लक्षणं आहेत.
-
मासिक पाळी दरम्यान शरीरातील हॉर्मोन्स सतत बदलत असतात ज्याने वजन वाढते.
-
मासिक पाळीच्या काळात महिला फारशा सक्रिय नसतात ज्यामुळे वजन वाढते.
-
प्रोजेस्टेरॉन हा शरीरातील स्त्रव मासिक पाळी येण्या अगोदर सक्रिय होतो ज्याने वारंवार भूक लागते, आणि यातून वजन वाढण्याची शक्यता असते.
-
मासिक पाळी दरम्यान शरीरातील मॅग्नेशियमचे प्रमाण कमी होते ज्यातून गोड खावंसं वाटतं आणि त्यातून वजन वाढण्याची शक्यता असते.
-
मासिक पाळीचा स्त्रियांच्या मानसिक आणि शारीरिक बाबींवर प्रभाव पडतो त्यामुळे वागणुकीत बदल जाणवू शकतो.
-
सर्वसाधारणपणे मासिक पाळीच्या काळात १-२ किलो वजन वाढू शकते.
-
येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.
-
(Photos: Pexels)

Chhaava Deleted Scene : ‘छावा’ चित्रपटातील डिलीट केलेला सीन व्हायरल, जबरदस्त संवाद ऐकून अंगावर येईल काटा