-
किडनी स्टोनची समस्या हल्ली अनेकांमध्ये दिसून येते. पुरेसं पाणी न प्यायल्याने किडनी स्टोन होण्याची शक्यता असते.
-
तसेच पाणी किंवा प्यायला पेय पदार्थ हा जर शुद्ध नसेल तरीही किडनी स्टोन होऊ शकतो.
-
काही साध्या गोष्टींचा आपल्या रोजच्या आहारात समावेश केल्यास किडनी स्टोन पासून मुक्तता मिळू शकते.
-
दिवसाला आठ ते दहा ग्लास पाणी प्यायल्यास स्टोन बनण्यासाठी गरजेचे असणारे मिनरल्स लघवी वाटे बाहेर पडून किडनी स्टोन बनवण्याची क्षमता घटू शकते.
-
आहारातील मिठाचे प्रमाण घटवल्यास लघवीतील कॅल्शियमचे प्रमाण कमी होऊन त्याचा फायदा होऊ शकतो.
-
प्रक्रिया केलेले रेडी टू इट सूट नूडल्स आणि खारट पदार्थ ज्याच्यात सोडियमचे प्रमाण अधिक आहे ते आहारात समाविष्ट करणे टाळावे.
-
पालक, स्ट्रॉबेरी, चहा यांच्यात ऑक्सालिक ऍसिड किंवा ज्याला ऑक्सिलेट असे म्हणतात त्याचं प्रमाण अधिक असून त्याचा सेवन करणे टाळावे.
-
जर किडनी स्टोनचा त्रास असेल तर कोणत्याही प्रकारे व्हिटॅमिन किंवा मिनरल्स यांची मोठ्या प्रमाणात मात्रा घेते वेळी डॉक्टरांशी यासंदर्भात बोलावे कारण शरीर ‘व्हिटॅमिन सी’चे रूपांतर ऑक्सिलेट मध्ये करतो यामुळे किडनी स्टोन वाढू शकतो.
-
साखरेचे प्रमाण वाढल्यास त्याचेही रूपांतरण ऑक्सिलेट मध्ये होऊन त्याने किडनी स्टोनचा धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे हवाबंद डब्यातील साखरेचे पदार्थ खाणे टाळावे.
-
मांस मच्छीमध्ये प्युरीन असून त्याने यूरिक ॲसिड तयार होते ज्यामुळे किडनी स्टोनला धोका निर्माण होऊ शकतो तेव्हा त्यांचा आहारात समावेश कमीत कमी करावा.
-
गहू, तांदूळ, रे आणि बार्ली यांच्यात फायबरचे प्रमाण अधिक असून त्यामुळे लघवीतील कॅल्शियम कमी होते ज्याने किडनी स्टोन घटवण्यास मदत होऊ शकते.
-
दुग्धजन्य पदार्थ, चहा, चॉकलेट याच्यात ऑक्सिलेटचे प्रमाण जास्त असल्याने त्यांचा आहारातील समावेश टाळावा.
-
येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. (Photos: Pexels)

Chhaava Deleted Scene : ‘छावा’ चित्रपटातील डिलीट केलेला सीन व्हायरल, जबरदस्त संवाद ऐकून अंगावर येईल काटा