-
रोजच्या धावपळीच्या जीवनात त्वचेतील तजेलदारपणा, मुलायमपणा हरवल्याची तक्रार अनेकजण करतात.
-
सकाळी उठल्यावर त्वचेला जागं करण्यासाठी काही साध्या गोष्टींचा अवलंब करता येतो.
-
झोपून उठल्यावर सर्वात आधी चेहऱ्यावरील अधिकचं तेल, मृत त्वचा, त्वचेवरील छिद्रातील अशुद्धता काढणे आवश्यक आहे.
-
चेहरा स्वच्छ धुतल्याने रात्रभरात त्वचेत तयार झालेलं अधिकचं तेल, मृत त्वचा, टॉक्सिन निघून जाते.
-
सकाळी उठल्यावर चेहरा धुताना तो फक्त स्वच्छ पाण्याने धुवावा, साबणाचा वापर करू नये.
-
सकाळी उठल्यावर लिंबाचे काप चेहऱ्यावरून फिरवल्यास त्वचेतील धूळ कमी होऊन चेहरा उजळतो.
-
टोमॅटोच्या रस चेहऱ्याला लावून मसाज केल्यास त्वचा मुलायम होते आणि त्वचेचा रंग उजळतो.
-
सकाळी चेहरा थंड दुधाने धुतल्यास त्याने चेहऱ्याचा रंग उजळण्यास मदत होते आणि चेहरा मुलायम होतो तसेच चेहऱ्यावरील काळे डाग घालवण्यासही मदत होते.
-
हाताच्या डाव्या तळव्यावर दोन चमचे मध घेऊन चेहऱ्यावर वर्तुळाकार पद्धतीने पंधरा मिनिटे मालिश करून मग चेहरा गरम पाण्याने धुतल्यास चेहऱ्यावरील केसांची लव कमी होऊन चेहऱ्याचा रंग उजळतो.
-
स्ट्रॉबेरी ही व्हिटॅमिन ‘सी’ची महत्त्वाची स्त्रोत असून त्यामुळे डोळ्याखालील सुरकुत्या कमी होऊ शकतात.
-
स्ट्रॉबेरीचा रस हा डोळ्याखाली असणाऱ्या काळ्या वर्तुळांवर प्रभावी असतो.
-
येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. (Photos: Pexels)
३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख