-
कॉफी हे तजेला देणारं उत्तेजक पेय आहे. त्यातील कॅफेन या घटकामुळे आणि अतिसेवनाने शरीराला नुकसान होऊ शकते.
-
पण तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार योग्य प्रमाणात कॉफीचे केलेले सेवन हे आरोग्यासाठी लाभदायी ठरू शकते.
-
अभ्यासानुसार योग्य प्रमाणात केलेल्या कॉफीच्या सेवनाने गंभीर आजारांपासून मुक्तता मिळू शकते.
-
साल २०१४ च्या अध्यापनानुसार रोज नियमितपणे कॉफीचे सेवन केल्याने टाईप-२ मधुमेहाचा धोका कमी होऊ शकतो.
-
२०१९ मधील अभ्यासानुसार योग्य प्रमाणातील कॉफेच्या सेवनाने यकृताचा कर्करोग होण्याचे प्रमाण कमी होऊ शकते.
-
अमेरिकेतील तज्ज्ञांनी २०१५ साली केलेल्या अभ्यासानुसार रोज दिवसातून दोन-तीन वेळा कॉफी प्यायल्याने हायपेटोसेल्ल्युलर कार्सिनोमा आणि क्रोनिक लिव्हर डीसीस होण्याची शक्यता ३८ टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकते.
-
योग्य प्रमाणातील कॉफीच्या सेवनाने त्यातील कॅफेन हा घटक आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकतो.
-
२०१८ मधील अभ्यासानुसार कॉफीमुळे रक्तदाब नियंत्रणात येऊ शकतो तसेच दररोज तीन-पाच कप कॉफीच्या सेवनाने हृदयरोगाचे प्रमाण १५ टक्क्यांनी कमी होऊ शकते.
-
कॅफिनमधील फॅट बर्निंग सप्लिमेंट घटकामुळे शरीरातील मेदाचे प्रमाण कमी होऊन वजन कमी होण्यास उपयुक्त ठरू शकते.
-
कॅफेनमुळे शरीरातील ३-११ टक्क्यांनी मेटाबॉलिज्मचे प्रमाण वाढते आणि यामुळे वजन कमी होण्यास मदत होऊ शकते.
-
येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.
-
(Photos: Pexels)
भर रस्त्यात दोन सापांचं मिलन; पण लोकांनी मध्येच काय केलं पाहा, अंगावर काटा आणणारा VIDEO होतोय व्हायरल