-
अनेकजण चेहऱ्यावर येणाऱ्या मुरमांच्या समस्येने त्रस्त आहे. मुरमे ही एक अशी समस्या आहे ज्यावर उपाय केल्यानंतरही ते पुन्हा येऊ शकतात. मात्र, यामागे नेमकं कारण काय आहे हे लोकांना समजत नाही. आज आपण याचे कारण जाणून घेणार आहोत.
-
जेव्हा मुलं आणि मुली यौवनात येतात तेव्हा एंड्रोजन हार्मोन वाढतो. सेबमचे उत्पादन होऊ लागते आणि त्यामुळे मुरुमांची समस्या उद्भवते.
-
जास्त मेकअप केल्यानेही चेहऱ्यावर पिंपल्स येऊ शकतात. खरं तर मेकअप मॉइश्चरायझिंग क्रीम्स, लोशनमध्ये चेहऱ्यावरील छिद्र बंद करणारे सल्फेट्स असतात. यामुळे त्वचेवर पुरळ येतात.
-
दूध, दही, लोणी यासारख्या दुग्धजन्य पदार्थांचे अधिक सेवन केल्याने त्वचेमध्ये तेलाचे उत्पादन वाढते आणि त्यामुळेही मुरुमे होतात.
-
रक्तातील घाण वाढल्यामुळेदेखील मुरुमांची समस्या उद्भवते. जेव्हा रक्ताभिसरण सुरळीत होत नाही तेव्हा रक्तातील विषारी पदार्थ वाढू लागतात आणि मुरमांची समस्या उद्भवते.
-
खराब स्किनकेअर रूटीनमुळेदेखील मुरुमांची समस्या वाढू शकते. याशिवाय काही प्रोसेस्ड फूड, साखरयुक्त अन्न खाल्ल्याने कोलेजनचे प्रमाण कमी होते आणि मुरुमांच्या समस्या सुरू होतात.
-
वायुप्रदूषणामुळे त्वचेतील छिद्र बंद होतात. यामुळेच मुरुमांच्या समस्येला वारंवार सामोरे जावे लागते. म्हणूनच दिवसातून किमान दोन वेळ चेहरा धुणे आणि मॉइश्चरायझ करणे अत्यंत आवश्यक आहे.
-
जास्त तेलकट पदार्थ खाल्ल्यानेही मुरमांचा धोका वाढू शकतो. तेलकट पदार्थांच्या सेवनाने त्वचेतील सेबमचे प्रमाण वाढते आणि याच्या गंधाने जीवाणू आकर्षित होतात. ते त्वचेवर हल्ला करतात आणि यामुळे चेहऱ्यावर मुरमे येतात.
-
चिंता आणि तणाव कॉर्टिसॉल आणि अॅड्रेनालाईन सारख्या हार्मोन्सच्या पातळीवर थेट परिणाम करतात, यामुळे मुरुम वाढू शकतात.
-
येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. (Photos: Freepik)
Devendra Fadnavis: सर्वपक्षीय बैठकीला ठाकरे गटाची दांडी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला खरपूस समाचार