-
बदलत्या काळानुसार आपले जीवन अधिक आरामदायक झाले असले तरीही आपल्याला अनेक गंभीर आजारांनीही घेरले आहे. मधुमेह हा असाच एक आजार आहे, जो होण्यामागे आपली जीवनशैली आणि आपला आहार कारणीभूत आहे.
-
तसेच, हार्मोनल असंतुलन, हृदयविकार, धूम्रपान, शारीरिक हालचालींचा अभाव आणि लठ्ठपणा याप्रमाणेच मधुमेहाची इतर अनेक कारणे असू शकतात. मधुमेहामध्ये रक्तातील साखरेची पातळी अनियंत्रितपणे वाढत आणि कमी होत राहते. रक्तातील साखरेचे प्रमाण जास्त काळ वाढलेले राहिल्यास हृदय, किडनी आणि फुफ्फुसांचे नुकसान होऊ शकते.
-
सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनच्या मते, 90mg/dl किंवा त्यापेक्षा कमी फास्टिंग शुगर सामान्य मानली जाते. जेवणानंतर रक्तातील साखरेचे प्रमाण 140 mg/dl पर्यंत सामान्य मानले जाते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी दिवसभर रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे असते.
-
रक्तातील साखरेचे प्रमाण वाढले की शरीर काही संकेत देऊ लागते. मधुमेहाची पातळी धोक्याच्या पातळीवर पोहोचल्यावर शरीरात कोणती लक्षणे दिसतात आणि दिवसभर आपल्या रक्तातील साखरेची पातळी काय असावी हे जाणून घेऊया.
-
१३ ते १९ या वयोगटातील मुलांची फास्टिंग शुगर लेवल 70 ते 150 mg/dL, जेवणाआधीची रक्तातील साखरेची पातळी 90 ते 130 mg/dL, जेवणानंतरची साखरेची पातळी 140 mg/dL आणि झोपण्याच्या वेळी साखरेची पातळी 90 ते 150 mg/dL असावी.
-
२० पेक्षा जास्त वयाच्या व्यक्तीची फास्टिंग शुगर लेवल 70 ते 100 mg/dL , जेवणाआधीची रक्तातील साखरेची पातळी 70 ते 130 mg/dL, जेवणानंतरची साखरेची पातळी 180 mg/dL आणि झोपण्याच्या वेळी साखरेची पातळी 100 ते 140 mg/dL असावी.
-
४० ते ५० या वयोगटातील व्यक्तीची फास्टिंग शुगर लेवल 90 ते 130 mg/dL , जेवणाआधीची रक्तातील साखरेची पातळी 70 ते 130 mg/dL, जेवणानंतरची साखरेची पातळी 140 mg/dL आणि झोपण्याच्या वेळी साखरेची पातळी 150 mg/dL असावी.
-
रक्तातील साखरेचे प्रमाण धोक्याच्या पातळीवर पोहोचल्यावर शरीरात खालील लक्षणे दिसतात.
-
अधिक तहान लागणे आणि तोंड कोरडे होणे.
-
सतत लघविला होणे.
-
थकवा जाणवणे.
-
अचानक वजन कमी होणे.
-
अंधुक दृष्टी
-
लघवीमधून संसर्ग होणे.
-
मधुमेही रुग्णाने आपल्या रक्तातील साखरेचे प्रमाण निरंटरणात ठेवण्यासाठी शरीर सक्रिय ठेवणे आणि आपल्या आहारकडे लक्ष देणे अतिशय आवश्यक आहे. नियमितपणे रक्तातील साखरेचे प्रमाण तपासत राहिल्याने मधुमेह्यावर नियंत्रण मिळवता येऊ शकते. (फोटो: Freepik)
३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख