-
कंफर्टेबल आणि हटके ओव्हरसाईज्ड कपडे हे दशकांपासून ट्रेंडमध्ये आहेत. पण त्यांना योग्यप्रकारे स्टाईल करणं तितकंच कठीण काम आहे. (Photo: Komal Pandey/Instagram)
-
ओव्हरसाईज्ड कपडे घालताना अनेक गोष्टी लक्षात ठेवून स्टायलिंग करावं लागतं. (Photo: Pexels)
-
ओव्हरसाईज्ड कपडे घालताना त्यासोबत घालावयाच्या इतर गोष्टींशी ड्रेसिंग बॅलन्स करणं गरजेचं असतं. (Photo: Pexels)
-
ओव्हरसाईज्ड टी-शर्ट किंवा हुडीवर स्लिम फिट लेगिन्स, जीन्स घातल्यास लूक बॅलन्स होतो. (Photo: Pexels)
-
ओव्हरसाईज्ड टॉप किंवा स्वेटर, स्कर्ट तसेच पॅण्टमध्ये टक-इन केल्यास कंबरेभोवती आभासी रेषा तयार होऊन त्यातून छान लूक तयार होतो. (Photo: Hina Khan/Instagram)
-
कार्डिगन किंवा वेस्टकोट, ब्लेझर इत्यादींचे ओव्हरसाईज्ड टॉप, स्वेटर, शर्टवर लेयरिंग करून क्लासिक लूक करता येऊ शकतो. (Photo: Komal Pandey/Instagram)
-
फक्त कपडयांनीच नाही तर दागिने, बॅग यांनीसुद्धा ओव्हरसाईज्ड लूकमध्ये अजून हटकेपणा आणता येऊ शकतो. (Photo: Komal Pandey/Instagram)
-
स्लिक ड्रेसवर डेनिम जॅकेट, ओव्हरसाईज्ड स्वेटर आणि लेदर पॅण्ट असे वेगवेगळे मटीरियलचे कपडे एकत्र स्टाईल करून भन्नाट लूक करू शकता. (Photo: Pexels)
-
ओव्हरसाईज्ड ड्रेसला जर थोडं नीट स्ट्रक्टचर्ड लूक द्यायचा असेल तर ड्रेसवर कंबरपट्टा वापरून त्यातून फिटेड लुक बनवता येऊ शकतो. (Photo: Hina Khan/Instagram)
-
ओव्हरसाईज्ड ड्रेस, टॉप, शर्ट यांवर जॅकेट घालून तुम्ही कमाल लूक करू शकता. (Photo: Pexels)
-
थोडे उठावदार रंग वापरून तसेच वेगवेगळ्या रंगसंगती करून ओव्हरसाईज्ड कपडे तुम्ही घालू शकता. (Photo: Pexels)
-
सध्याच्या ट्रेंडनुसार ओव्हरसाईज्ड ट्रेंच जॅकेटचा वापर करून तुम्ही हाय फॅशन लूक तयार करू शकता. (Photo: Komal Pandey/Instagram)
३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख