-
अनेकांना सकाळी नाश्त्याला पीनट बटर आणि ब्रेड खाण्याची सवय असते. तुम्हालाही पीनट बटर आवडतं का? तुम्हाला जर पीनट बटर आवडत नसेल, तर त्याचे शरीराला होणारे महत्त्वाचे फायदे आज आपण जाणून घेऊया.
-
अगदी घरी बनवता येईल इतकी साधी रेसिपी असलेलं पीनट बटर शरीरासाठी अत्यंत उपयुक्त आहे.
-
त्यात उपयुक्त फॅट्स, प्रथिने, फायबर आणि व्हिटॅमिन्ससुद्धा असतात.
-
यातील प्रथिनांमुळे पोट लगेच भरते आणि यामुळे जास्त भूक न लागत वजन कमी होण्यास मदत होते.
-
यात कर्बोदकांचे प्रमाण कमी असल्याने ‘टाईप २’ मधुमेह असणाऱ्यांसाठी हा उत्तम पर्याय आहे.
-
पीनट बटरमधील अँटिऑक्सिडंटमुळे रक्ताभिसरण सुरळीत होऊन हृदयविकाराचा धोका कमी होऊ शकतो.
-
शेंगदाण्यांमुळे शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी होतात आणि चांगले कोलेस्ट्रॉल वाढीस लागते. यामुळे पित्ताशयात खडे होण्याचा धोका कमी होतो.
-
पीनट बटरमधील मिनरल्स आणि लोहामुळे हाडं मजबूत होतात.
-
येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. (Photos: Freepik)

१०० वर्षांनंतर शनी गोचर अन् सूर्यग्रहणाचा दुर्मीळ संयोग, ‘या’ राशीच्या लोकांना मिळणार पैसाच पैसा; करिअर, व्यवसायात चमकेल नशीब