-
केसगळतीमुळे ग्रासलेल्यांची अनेक उदाहरणं आपण आपल्या आजूबाजूला पाहत असतो. केसगळती मागे अनेक कारणं असू शकतात.
-
पण काही सोप्या गोष्टींचा अवलंब केला असता ही समस्या दूर होऊ शकते.
-
आवळा हा व्हिटॅमिन सीचा महत्वाचा स्रोत असून त्यामुळे केसांची मुळं घट्ट होतात आणि केसगळती कमी होऊ शकते. तसेच आवळ्याने त्वचेलाही अनेक फायदे होतात.
-
मेथीचे दाणे अनेक आजारांवर उपयुक्त ठरतात. मेथीच्या दाण्यातील निकॉटेनिक अॅसिडमुळे केसगळती तसेच कोंडा कमी होऊ शकतो.
-
कडीपत्यातील अँटी-बॅक्टरीअल आणि अँटी-मायक्रोबायल घटक एकूणच आरोग्यासाठी फायदेशीर असतात. कडीपत्यातील व्हिटॅमिन सी, बी हे घटक तसेच अँटिऑक्सिडंट्स केसांच्या वाढीसाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकतात.
-
प्रथिने, व्हिटॅमिन्स आणि अँटिऑक्सिडंट्सयुक्त भृंगराज केसांच्या वाढीसाठी फायदेशीर ठरू शकतो. अल्पवयात केस पिकणे आणि केसगळती या समस्यांवर भृंगराज तेल खूप उपयुक्त ठरतं.
-
कोरफडीच्या गरात व्हिटॅमिन ए, सी, आणि बी असून त्वचा आणि केसांसाठी अत्यंत फायदेशीर आहे.
-
येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. (Photos: Freepik)

Chhaava Deleted Scene : ‘छावा’ चित्रपटातील डिलीट केलेला सीन व्हायरल, जबरदस्त संवाद ऐकून अंगावर येईल काटा