-
जास्मिनच्या फुलांतून मिळणारं तेल हे अनेक गोष्टींसाठी उपयुक्त असतं. जास्मिनच्या तेलाचा वापर अधिकतर ऍरोमाथेरापी आणि अत्तर बनवण्यासाठी केला जातो.
-
शतकांपासून जास्मिनचं तेल हे वेगवेगळ्या प्रकारे वापरलं जात असून त्याचे अनेक फायदे ही आहेत.
-
जास्मिनच्या तेलाचे काही थेंब अंघोळीच्या पाण्यात घातले असता त्याने शरीर रिलॅक्स होते.
-
रुक्ष त्वचेला मुलायम करण्यासाठी ही जास्मिनच्या तेलाचा वापर केला जातो.
-
चेहऱ्याला लावायच्या मॉइश्चरायझरमध्ये तसेच बॉडीलोशनमध्ये काही थेंब जास्मिन तेल घालून ते वापरू शकता.
-
ऍरोमाथेरपीसाठी जास्मिन तेल सर्रास वापरलं जातं.
-
मानसिक तणाव, नैराश्य यांसाठी ऍरोमाथेरपी अत्यंत फायदेशीर ठरते.
-
प्रत्यक्ष तेलाच्या बाटलीतून किंवा कापसावर थोडंसं तेल घेऊन त्याचा सुगंध तुम्ही घेऊ शकता.
-
नारळाच्या किंवा बदामाच्या तेलात जास्मिन तेल मिसळून त्याने अंगाला मालिशदेखील करू शकता.
-
मालिशमुळे शरीरातील स्नायू मुक्त होऊन शरीर रिलॅक्स होते.
-
जोजोबा तेलात काही थेंब जास्मिन तेल टाकले असता उत्तम अत्तर तयार होते.
-
येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. (Photos: Freepik)

३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख