-
पायांना भेगा पडल्याची समस्या अनेकांना सतावते आणि त्यामुळे चालणे ही कठीण होऊन जाते.
-
पायांना भेगा पडण्यामागे अनेक कारणं असतात.
-
काही सोप्या टिप्सचा अवलंब केल्यास फायदेशीर ठरू शकते.
-
पायाची त्वचा रुक्ष झाल्याने भेगा पडतात.
-
त्वचेतील मुलायमपणा कायम ठेवण्यासाठी दिवसातून दोनदा मॉइश्चराझर लावू शकता.
-
शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यावरही बऱ्याचदा त्वचा कोरडी पडत असल्याने त्यातून भेगांची समस्या उद्भवते.
-
त्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण संतुलित राखण्यासाठी दिवसभरात किमान ८ ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे.
-
फूट स्क्रब किंवा प्युमिस स्टोनने मृत त्वचा काढून टाकण्यास मदत होते.
-
मृत त्वचा काढल्याने भेगांची समस्या कमी होऊ शकते.
-
परंतु मृत त्वचा काढताना काळजी घ्यावी अन्यथा त्यामुळे त्वचेला अधिक हानी होऊ शकते.
-
कोमट पाण्यात काही काळ पाय ठेवल्यानेही मृत त्वचा निघून जाऊन त्वचा मुलायम होते.
-
येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. (Photos: Freepik)
VIDEO: “डोळे उघडले तेव्हा मी देव माशाच्या तोंडात होतो” तरुणाला जिवंत गिळलं; पण पुढच्याच क्षणी जे घडलं ते पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही